कविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट २

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ११ : प्रतिभा - kautukshirodkar

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 23:38

प्रवेशिका ११ : प्रतिभा

मूळ कविता : कविता

कळूनही न वळलेल्या कविता
वाचूनही न उमगलेल्या गझला
उमजूनही न रुचलेले लेख

या सा-यांचं स्पर्धेअखेर शेवटी
मुल्यांकन होईल,
तेव्हा तुझे समिक्षण परिक्षण करण्याचं
धाडसही उघडं पडेल आणि त्या शेर्‍यांमुळे
मी पाहू शकेन थेट तुझ्या डोळ्यांत
मला कधीच न दिसलेली बेगडी

प्रतिभा.....

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका १० : रहस्य - Mrugnayani

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 22:53

प्रवेशिका १० : रहस्य

मूळ कविता : कविता

दाटूनही न लागलेली झोप
स्वप्न पडत असूनही न घेता आलेला आनंद
साखरझोपेत असूनही जागेपणाची जाणीव
ह्याचा जेव्हा पहाटे कडेलोट होईल आणि लाइट लावून
लख्ख उजेडात उशी खाली मी तुला पहिल तेव्हा तुझ्या
टम्म फुगलेल्या पोटावरुन ढेकणा मी ओळखु शकेन
मला न लागलेल्या झोपेचे रहस्य.......

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ९ : माझी स्लीम छबी..... - kalpana_053

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 12:08

प्रवेशिका ९ : माझी स्लीम छबी.....

मूळ कविता : कविता

धावून-पळूनही न कमी झालेले वजन
उपाशी राहूनही न झुकलेला काटा
दुपारच्याही जागरणाने न झालेली वामकुक्षी
या जीवघेण्या प्रयत्नांच्या शेवटी
जेव्हा माझं वजन थोडसं कमी होईल,
तेव्हा माझ्या मलूल हाडं-सापळ्याचं
प्रेतवती दर्शन घडेल आणि त्या अर्धमेल्या अवस्थेतही
मी वाचू शकेन तुझ्या थेट नयन्-दर्पणांत
मला आधीच ना-कळलेली माझीच
"अनोळखी" स्लीम छबी
अन् तुला जिंकल्याचे भाव.....!!

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ८ : जॅकपॉट - tanyabedekar

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 01:43

प्रवेशिका ८ : जॅकपॉट

मूळ कविता : कविता

कळूनही तोच लावलेला नंबर
काल निघूनही आज लावलेली फिगर
रनिंगला वाढवत नेलेला रुपयाचा शंभर
ह्या सार्‍याचा विचार करता जेव्हा
बिडीचा धूर होउन जाईल,
तेव्हा सात वाजता निघालेल्या ओपनमध्ये
हुरहुरणारे क्षण विरतील आणि त्या क्षणातही
मी स्वप्न बघेन उद्याच्या क्लोजचे
मला कधीच न लागलेला कल्याणचा
जॅकपॉट

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ७ : कार्टा - mrinmayee

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:43

प्रवेशिका ७ : कार्टा

मूळ कविता : कविता

घासूनही न चमकलेले दात
पुसूनही न स्वच्छ झालेलं तोंड
विंचरूनही न बसलेले केस
ह्या सगळ्यांचं दिवसाच्या शेवटी
जेव्हा कळकट वाण होईल
तेव्हा तुझ्या पोटातल्या गुरगुरणार्‍या भुकेचं
काही एक न चालता, तुझ्या अकलेच्या उजेडातही
मी हाणू शकेन तुझ्या पाठीत
हाताला कधीपासून शिवशिववणारा सणसणित
रट्टा.....

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ६ : बिलंदर - slarti

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:39

प्रवेशिका ६ : बिलंदर

मूळ कविता : कविता

सुचूनही न लिहीलेले रसग्रहण
साथीच्या रोगातही न मारलेल्या राउंड्स
उंचावर नसूनही असणारी हिल स्टेशनं
या सार्‍यांचं शेवटी एकदाचं
जर अर्काइव्ह झालंच,
तर तुझ्या बिलंदरी असण्याचं
इंगित सापडेल आणि त्या अर्काइव्ह्जमध्ये
आम्ही पाहू शकू थेट तुझ्या पोस्टांत
आम्ही कधीच न ओळखलेला तुझा
मूआय (अर्थात, मूळ आयडी).......

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ५ : ओझ्याचा बैल - kavita.navare

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:34

प्रवेशिका क्र. ५ : ओझ्याचा बैल

मूळ कविता : कविता

नकाराच्या भीतीन मी न लिहीलेल प्रेमपत्र
रोझ डेला माझ्या हातून गळून गेलेला गुलाब
आमंत्रण येऊनही चुकवलेल तुझं लग्न
हे सारच आयुष्याच्या वळणावर
जेव्हा पुन्हा सामोरं येईल
तेव्हा ओझ्याच्या बैलासारखा;
वाकलेला नवरा मला दिसेल आणि त्या प्रसंगीही
मी वाचू शकेन थेट त्याच्या डोळ्यात
"साल्या, तू सुटलास नी मी झालो
फक्त ओझ्याचा बैल"

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ४ : हिशेब - Girish Kulkarni

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:30

प्रवेशिका ४ : हिशेब

मूळ कविता : कविता

शिकुन-सवरुनही न गिरवलेले धडे
ओढुन्-ताणुनही न आणलेल अवसान
मारुन्-मुटकुनही न सावरलेली घडी
या सार्‍यांची जेव्हां शेवटी
गोळा-बेरीज होईल.....
तेव्हां तुझ आळसात आयुष्य बुडवण्याच
एक मोठ्ठ वजाबाकीच गणित होईल अन त्यातही
मला करावेच लागतील...अगदी माझ्याच घरात
मी आयुष्यात कधीही न केलेले
हिशेब ......

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका ३ : असाध्य - lalu

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 13:06

प्रवेशिका क्र. ३ : असाध्य

मूळ कविता : कविता

चुकूनही न सुचलेल्या कविता
उघडूनही न थांबलेला पाऊस
साच्यानेही न जमलेल्या (मोदकाच्या) कळ्या
या सा-यांचं शेवटी
जे कडबोळं होईल
तेव्हा तुझ्या खोखो हसण्यानं
मला जोरात रडू फुटेल आणि रडतानाही
मी पाहू शकेन थेट तुझ्या डोळ्यांत
मला कधीच न सुचलेलं
स्वतःवरच हसणं..

कायापालट स्पर्धा "कविता" प्रवेशिका २ : यमकांचं गमक - mkarnik

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 20:55

प्रवेशिका २ : यमकांचं गमक

मूळ कविता : कविता

ना सुचूनही लिहिलेल्या त्या कविता,
खोडूनही ना फाटेल असा तो कागद,
फिरफिरून तासली तरि नाही जी झिजली
ती पेन्सिलही नि:शब्द अशी पडलेली.
जेव्हा….
तारीख दिलेली उलटुन गेलि असेल
तेव्हा त्या कागदावर….
काव्यप्रसववेदनांचे वांझोटे बिंब पडेल
अन् त्यातूनच मग वाचू शकेल वाचक
मज कधी न जमलेल्या यमकांचे गमक

Pages

Subscribe to RSS - कविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट २