काव्यलेखन

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे - girish kulkarni

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:58

प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

रंगढंग रोज तुझे नव-नवे बरसत होते
मत्सराचे आम्लपित्त असावे...समजत होते

का हा अचानक उलटे उसासे सोडू लागला
का त्याला रदीफ्-काफीया एव्हढेच अवगत होते?

त्याचा राग होता कशावर कोठे काही कळेना
त्याचे ताळतंत्र सुटले यावर मात्र सार्वमत होते

तो स्वताला यौवनाचा जालीम जाणकार म्हणवतो
घरच्या घरीच हाय त्याची केव्हढी फसगत होते

त्याचे विचारणे-बोलणे-लिहीणे बेलगाम इतके
साध्या सौजन्याचीही चटकन केव्हढी फारकत होते

बरे झाले त्याचा कुठेही संचार मोजकाच असतो

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ३

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:53

प्रवेशिका ३

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

घडोघडी अस्वस्थ मी रीफ्रेश मारत होते
काही नवे नाही ..सर्व्हर का निद्रिस्त होते

मायबोलीचीच पहावी का कुंडली कोणी
सगळेच असे का प्रेमकविता पाडत होते ?

कशास होती सुरू तिथे ती चर्चा नक्की?
कुडमुडे व्यासंगी धबाबा पोस्टत होते

खरेच का कळती कविता यांना
वाहवा! जे नित्यही म्हणत होते

कितीक परोपकारी शंकासूर येथे
मित्र मैत्रिणींच्या अडचणी विचारत होते

वैभवा तुझ्यासारखे कवी क्वचितच नशिबी
बरेचसे बिचारे! कळत नव्हते, बरळत होते

सुरेख तुझी ही गजल पाहता

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका २ : फसगत - sharadpatil

Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 10:22

प्रवेशिका २ : फसगत

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

सत्तेच्या धुंदीत नको ते बरळत होते..
आपण जनतेचे सेवक हे विसरत होते!

झुंडीपुढती नमते घेती का सरकारे?
इतिहासाचे धडे पुन्हा का बदलत होते?

वर्तमानपत्रात धुमाळी अपशब्दांची,
निवडणुकांची नांदी झाली... समजत होते!

थंडपणाचा आव आणती षंढ माणसे,
कधीतरी पण रक्त तयांचे उसळत होते!

तुझी करावी स्तुती असे वाटलेच नव्हते
जे होते ते माझ्या हातुन नकळत होते!

कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका १ : पाचक हझल - slarti

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 14:24

प्रवेशिका १ : पाचक हझल

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

गंध वनाचे क्षणाक्षणाला बदलत होते
कुणीतरी अस्वस्थ असावे समजत होते

आज अचानक काय बिनसले असेल ह्याचे
काल जयाचे तोंड गपापा हदडत होते

मी काही ठरवून कंट्रोल गमवत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते

फुकाच होती सुरू तिथे ती चर्चा नक्की
हाजमोल्याशिवाय कोणास करमत होते ?

प्रकृती अता कशी ? हे आता पुसणेच नको
पुसताना पाहिले का ? मनी चरकत होते

आज करत प्रतिज्ञा लंघन लिंबूपाण्याच्या
एवढ्याने काय होते ? काल बरळत होते

"कायापालट - द मेक ओव्हर" अर्थातच विडंबन स्पर्धा क्र. २

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 07:45

स्पर्धेचे नियम :

१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.

२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.

३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.

४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्‍या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.

५. विडंबन करताना शक्यतो वृत्त्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!

६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.

७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.

८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.

जुलै महिन्यातील सर्वोत्तम कविता

Submitted by admin on 20 August, 2009 - 01:40

जुलै महिन्यात या २ कविता सर्वोत्तम म्हणून निवडल्या आहेत.

http://www.maayboli.com/node/9618 [सलीम : गिरीश कुलकर्णी] मोजक्या, नेटक्या शब्दांत भीषण वास्तवाची जाण करून देणारी अंतर्मुख करणारी, अस्वस्थ करणारी कविता. वास्तवातून उलगडून दाखविलेलं त्रिवार सत्य. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पण सुबोध मांडणी. त्यांच्या ईतरही कविता वाचनीय आणि विचारांना मनाचा एक वेगळाच कोपरा दाखवीत मोजक्या शब्दांत आशय व्यक्त करणार्‍या आहेत.

"कायापालट - द मेक ओव्हर" अर्थातच विडंबन स्पर्धा क्र. १

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 00:41
कायापालट - द मेक ओव्हर
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव जिल्ह्याचे भकासकार मा. श्री. नस्तेउद्योग पचपचे पाटील, प्रमुख पावणे तालुक्याचे उध्वस्तकार मा. श्री. आळसराव कामचूके पाटील, गरमपंचायतीचे सरपण मा. श्री. लाकूडराव कोळसे पाटील आन हिथं जमलेल्या समद्या कुडबूड्या ग्रामस्थ मंडळींनो....आज आपल्या गावच्या 'सार्वजणिक गनेशोत्सव मंडळाचे' वतीने घेण्यात येणार्‍या विडंबन स्पर्धेची घोषणा करताना आम्हा सर्वांणाच लय आनंद होतो हाये. संयोजकांकडूण चार परसिद्ध सिद्धहस्त कवींच्या सुंदर सुंदर कवीता देण्यात येतील. त्येंची सम्मती अन माफी गुरहीत धरुन तुम्ही स्वतःच्या- नसल्यास दुसर्‍याची उसणी घेउन, त्याला प्रताधिकार बहाल करुण- बुद्धीला चालणा देऊण तिला अजूकच सुंदर बनवायचे आहे. मा. नाना पाटेकरांनी म्हणलेच आहे...जग सुंदर आहे, ते मी अजून सुंदर बनिवणार.... आपले आळसरावसाहेब पाटीलजी अन नस्तेउद्योगरावसाहेब पाटीलजी ज्यापरमाणे गावाचा भकास करुन र्‍हायले, त्येंच्या पावलावर पाउल ठेउण आपण कवितेला सुंदर बणवायचे हाये...तुमी बी कविता सुंदर करुन लिवायला घ्यावा! त्येंचा पार मेकओव्हर करूण टाका!!!
-------------------------------------------------------------------------------------- स्पर्धेचे नियम :
१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.
२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.
३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.
४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्‍या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
५. विडंबन करताना शक्यतो वृत्त्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!
६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.
८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.
९. एका आयडी तर्फे एकूण फक्त चारच एन्ट्री स्वीकारली जातील.
१०. विडंबन या अगोदर मायबोलीवर प्रकाशित झालेले नसावे.
११. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.
-------------------------------------------------------------------------------------- स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इमेल पाठवताना Vidamban spardha असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना प्रवेशिकेसोबतच मायबोली आयडी आणि प्रवेशिकेला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
४. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
--------------------------------------------------------------------------------------
मायबोलीकरांकडून आलेल्या सूचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणार्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
--------------------------------------------------------------------------------------
पहीली कविता :
रंग नभाचे - कवी वैभव जोशी - गझल
रंग नभाचे क्षणाक्षणाला बदलत होते
कुणीतरी अस्वस्थ असावे.. समजत होते

आज अचानक काय बिनसले असेल ह्याचे
ह्याच मनाला काल कुठेही करमत होते

कशास होती सुरू तिथे ती चर्चा नक्की?
वरवर बघता सर्व चेहरे सहमत होते

मी काही ठरवून व्यथांना बिलगत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते

विचारण्याचा रोख चुकीचा असेल तर मग..
साध्या साध्या शंकांचीही.. हरकत होते

तुझ्यासारखे हळवे होते मेघ कालचे
गर्जत नव्हते , बरसत नव्हते .. तरळत होते

अजूनही ती सांज हुंदके रोखत होती
दिशादिशांवर अजून काजळ पसरत होते

अलगद पानावरती बसले फूलपाखरू
बहुधा माझ्या वहीत काही उमलत होते....

रचनेबद्द्ल:
वैभव जोशींच्या अनेकानेक सरस गझलांपेकी ही एक अशीच सहजसुंदर गझल मात्रावृतात आहे. ८ + ८ + ८ अश्या एकूण २४ मात्रा आहेत. ’होते’ ही रदीफ़ आहे तर बदलत, समजत, करमत, सहमत हे त ने शेवट होणारे कवाफ़ी आहेत. ’अ’ ही अलामत आहे (बदलत मधला ’ल’, समजत मधला ’ज’, करमत आणि सहमत मधला ’म’ ह्यातला स्वर) गझलेचे विडंबन करताना गझलेचे नियम पाळून करावेत असा आग्रह आहे पण बंधन मुळीच नाही तेव्हा उचला आपली लेखणी आणि करा सुरुवात ’हझल’ लिहायला!!
-------------------------------------------------------------------------------------- आलेल्या प्रवेशिका:

जून २००९ - लक्षवेधी कवितांचे दालन

Submitted by Admin-team on 23 July, 2009 - 18:26

निवड समितीने सर्वोत्तम कवितेबरोबरच इतर काही लक्षवेधी कविताही निवडल्या आहेत. त्या कवितांचे दालन आपल्या आस्वादासाठी.

विस्कळीत पलटे -

जून महिन्यातील सर्वोत्तम कविता

Submitted by Admin-team on 14 July, 2009 - 11:04

जून महिन्यातील पुरस्कार अज्ञात आणि क्रान्ति यांच्या कवितांना विभागून देण्यात येत आहे.

कळले नाही - अज्ञात
http://www.maayboli.com/node/8232
अज्ञातांच्या कविता सहजसुंदर, सुबोध ! प्रभावी शब्दकळा. संयत चित्रण.

शेवंतीचं बन

Submitted by अजय on 7 July, 2009 - 21:56

"शेवंतीचं बन" हा अभिजात मराठी लोकसंगीतावर आधारीत कार्यक्रम अधिवेशनात सादर झाला. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. कधीही पहायची, ऐकायची संधी मिळाली तर अजिबात चुकवू नये असा.DSC01583.jpg

Subscribe to RSS - काव्यलेखन