विज्ञानकथा म्हणजे काय ?

Submitted by गारंबीचा शारूक on 20 March, 2022 - 11:35

एका कथेवर ऋन्मेष सरांचा खालील प्रतिसाद आहे.

"कित्येक संकल्पना विज्ञानाने सिद्ध झाल्या नाहीत तरी त्यावर लिहिलेल्या कथा विज्ञानकथा म्हणूनच धरल्या जातात असे मला वाटते. मग त्या परग्रहवासींबद्दल असोत वा टाईम ट्रॅव्हेलबद्दल. या कथेतील शरीर गायब होणे भूतखेतांसारखे न दाखवता मांडणी विज्ञानकथेसारखीच केली आहे असे या भागावरून वाटले म्हणून तसे म्हटले".

हा प्रतिसाद खूप खोल आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्यांनी तर कोरून ठेवायला पाहीजे. सर "वेष असावा बावळा " या वृत्तीने चालत असल्याने ते जरी इतरांना कमी जाणकार वाटत असले तरी त्यांच्यात एक तत्वचिंतक दडलेला आहे. तो ते कधी बाहेर काढत नाहीत. ते मनातल्या मनात इतरांना हसत असतात. पण आपल्यासारख्यांनी सरांनी अनवधानाने दिलेले असे प्रतिसाद पाहूनच थक्क व्हायचे असते. मलाही विज्ञानकथा कशाला म्हणायचे हे समजत नाही.

सरांनी अचूक बोट ठेवले आहे. भूतांच्या कथेत भूत गायब होणे, भिंतीतून आरपार जाणे यामागे लॉजीक देत नाहीत. तसेच विज्ञानकथात पण अलाऊड असते का ? कि विज्ञानाच्या नियमांच्या कसोटीवर या कथा असल्या पाहीजेत ? किंवा भविष्यात त्या खर्‍या होतील अशी शक्यता वाटली पाहीजे ?

मायबोलीवर अनेक जण संशोधन क्षेत्रात आहेत. ते यावर उजेड पाडू शकतील असे वाटल्याने धागा काढला आहे. आता या धाग्याची इज्जत आपल्याच हातात.

कृपया या धाग्यावर एकमेकांवर आरोप करू नयेत. वाद न करता आपली मते मांडावीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विज्ञान कथा या नेहमी काळाच्या पुढे असतात हे सिद्ध झालं आहे
त्यामुळे त्यात शक्य अशक्य असे काही नसते
फक्त घिसेंपिटे विषय टाळले तर उत्तम

"विज्ञानकथा म्हणजे काय?" असा धागा निघतो.
म्हणजे "विज्ञान म्हणजे काय?" हे सगळ्यांना समजलं आहे आणि त्याची व्याख्या आणि व्याप्ती सगळ्यांना मान्य आहे असे समजावे का?

उत्तर हो असेल तर मज पामरास ती व्याख्या आणि व्याप्ती माहीत नाही. कुणी ते समजावून सांगेल काय?

विज्ञान काल्पनिका. त्यात जरा तरी विज्ञान असावे अशी अपेक्षा असते. एखादी अफाट कल्पना जर सध्याच्या चौकटीत बसत नसेल आणि तिला आव्हान देता येत नसेल तर तिला विज्ञान काल्पनिका म्हणता येते.
टाईम ट्रॅव्हल ही काही काळापूर्वी अशी भूल पडलेली होती. ती कल्पना अशक्य आहे हे आता सिद्ध झाले असल्याने त्या कल्पनेवरच्या कथांना फक्त काल्पनिका म्हणता येईल. वॉर्म होल ही कल्पना आज सिद्धही करता येत नाही आणि तिला आव्हानही देता येत नाही. त्यामुळे इंटरस्टेलार ही कलाकृती विज्ञान काल्पनिका आहे.
असे माझे मत.

टेनेट या नोलानच्या कथेवर मात्र उलट सुलट मते येत राहतात.
वानगीदाखल एक इथे डकवतो.
https://www.latimes.com/entertainment-arts/movies/story/2020-09-04/scien...'s,to%20move%20backward%20through%20time.

मानव उर्फ शांत माणूस उर्फ गारंबी - उत्तम धागा...

या धाग्यावर चर्चा करायला मजा येईल... जे न देखे रवी ते विज्ञान दाखवी...

ती कल्पना अशक्य आहे हे आता सिद्ध झाले असल्याने त्या कल्पनेवरच्या कथांना फक्त काल्पनिका म्हणता येईल
>>> हे कधी सिद्ध झाले?

च्रप्स Lol
तुमचा आयडी (गारंबी) माझ्या खात्यात जमा करताय की चक्क. चालेल मला. पासवर्ड द्या फक्त. Lol

तुमचा आयडी (गारंबी) माझ्या खात्यात >>> मी आणि च्रप्स एकच कशावरून ? सिद्ध करा.

ऋ सरांनी सूचना केली म्हणून वाद टाळण्यासाठी हा धागा आहे. तरी यावर वाद नका घालू कुणीही ही माझी गरीबाची विनंती आहे. Happy
च्रप्स सर , तुम्ही मी आणि ऋन्मेष एकच आहोत असे खूप जणांना वाटते. कुणा कुणाचे समाधान करणार. या धाग्यावर नको ते.
त्यावर सर धागा काढणार आहेत. तेव्हां आपण बोलूयात. Happy

आशुचॅम्प, मी विधान केले असून प्रश्न केला आहे.
त्यातील भाग उचलून जणु ते मी विधानच केले आहे असे भासवून तुम्ही प्रतिप्रश्न करत आहात.

च्रप्स, तुमचे अवांतर सोडून देऊन प्रश्नाला उत्तर देतो.
ही लिंक सध्या पहा.
https://futurism.com/the-physics-of-time-why-time-travel-may-be-impossible

बाकी या विषयावर खूप काही मटेरियल आहे. लोकांना पण बोलू देत.

लोकहो, ड्यू आयडीवरून पुन्हा पुन्हा तेच वाद नका घालू..
मी सर्व संशयास्पद आयडींची जबाबदारी माझ्या शिरावर घेतो.
धागा चांगला आहे तर ईथे फक्त विज्ञानकथा आणि वैज्ञानिक संकल्पनांवर चर्चा करा..

<मानव उर्फ शांत माणूस उर्फ गारंबी >>
एक कुतुहल म्हणुन विचारतोय च्रप्स. असे का वाटले?
या आधीही तुम्ही मी अजुन कुणीतरी ऑर व्हाईस अ व्हर्सा असे समजलात, (चालायचेच, तक्रार नाही त्याबद्दल) पण व्हास्टनेस वाढला म्हणुन कुतूहल.

Why Time Travel May Be Impossible
>>>>
May be आहे शीर्षकातच ..

मानव +१
किमान इथे ही चर्चा नको होती. च्रप्स स्कोअर सेटल करायचा असेल तर घाई करू नका. अजून धागे निघतच राहतील. दुसरीकडे स्कोअर सेटल करा. अ‍ॅडमिन, शक्य असेल तर थोडीशी साफसफाई करावी ही विनंती.

टाईम ट्रॅव्हल ही काही काळापूर्वी अशी भूल पडलेली होती. ती कल्पना अशक्य आहे हे आता सिद्ध झाले असल्याने त्या कल्पनेवरच्या कथांना फक्त काल्पनिका म्हणता येईल.>>>>
Physicists like me who are investigating time travel are not currently at the point of taking out patents on a time machine. But we are investigating whether building one is possible in principle, under the laws of physics. It’s a high-stakes game played by some of the brightest people in the world: Einstein showed that time travel to the future is possible and started the discussion. Kurt Gödel, Kip Thorne, and Stephen Hawking have each been interested in the question of whether time travel to the past is possible. The answer to that question would both give new insights into how the universe works and possibly some clues as to how it began.

from
Time travel in Einstein’s universe : the physical possibilities of travel through time / J. Richard Gott III

मानव - ती गम्मत होती...

शांत माणूस - ती लिंक चांगली आहे पण ते प्रूफ नव्हे... न्यूटन ची ग्रॅव्हिटेशन थियरी पण थेयरीच जोपर्यंत आईनं स्टाईन ने जेनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली आणि 1919 मध्ये ते एक्लिप्स झाले ज्याने प्रूफ मिळाले..

स्टीफन हॉकिंग यांचे मत
https://www.businessinsider.com/stephen-hawking-book-backward-time-trave...

स्टीफन हॉकिंग यांनीच एके काळी टाईम ट्रॅव्हलला विरोध दर्शवला होता. त्यांचे लेटेस्ट मत मुद्दामून दिले आहे. त्याचे विश्लेषण व्हायला हवे.

बाकी रोबोज पृथ्वीवर अवतरतील ही काही काल्पनिका नाही. ते सत्यापासून काहीच अंतर जवळ आहे. पण यावरच्या विज्ञान काल्पनिका या क्लिशे आहेत. हजारो सिनेमे, कथा आहेत. त्यात नावीन्य उरलेले नाही.

विज्ञानकथेतले लॉजिक त्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये लॉजिकल असते

एप्रिल मे जून

सिक्रेट ऑफ डंबलडोर
जुरासिक पार्क

तो ती
तो ती आणि ती
तो ती तो इत्यादी इत्यादी ह्या वर रामायणा पासून लोक लिहित आहेत. मग ते क्लिशे ?

स्टीफन हॉकिंग यांनीच एके काळी टाईम ट्रॅव्हलला विरोध दर्शवला होता. त्यांचे लेटेस्ट मत मुद्दामून दिले आहे. त्याचे विश्लेषण व्हायला हवे.
>>> परत तेच... अरे न्यूटन चे विधान खंडित झाले.. हवकीन्स क्या चीज है... पण न्यूटन चे नियम रॉंग सिद्ध करायला एक आईन्स्टाईन लागतो... नक्कीच येईल कोणीतरी भविष्यात...

धाग्याचा विषय आहे,
विज्ञानकथा म्हणजे काय ? ते सोडून आपण मोठ मोठ्या जगप्रसिध्द नोबल प्राईझ शास्त्रज्ञांच्या मांडीला मांडी लावून टाईम ट्रॅव्हल वर चर्चा करत आहोत..

च्रप्स, तुम्ही फक्त टाटॅ म्हणजे काय हे सांगा कृपया . उपकार होतील.
न्यूटन आणि आईनस्टाईनचा यात कसा संबंध आहे हे पण सांगा. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा कळेल. नाहीतर तुमच्या लेव्हलला पोहोचून आपण कसे चर्चा करणार ?

च्रप्स, तुमच्या प्रतिसाद क्र. २, ४ आणि ५ ला अनुसरून विचारले आहे. उत्तर द्यायचे असेल तर द्या. आग्रह नाही.
टाईम ट्रॅव्हल म्हणजे काय हे अनेक जणांना समजेल.

Pages