डॉ. जयंत नारळीकर यांचा 'सूर्याचा प्रकोप' हा विज्ञान कथासंग्रह वाचला.
विज्ञान कथांच्या माध्यमातून, वैज्ञानिक माहिती व संकल्पना हसत खेळत समजावून सांगण्याची त्यांची हतोटी वाखाणण्यासारखी आहे.
उदाहरणार्थ, 'सूर्याचा प्रकोप' ह्या कथेत, 'सोलर कॉन्स्टंट' मध्ये तात्पुरती वाढ होण्याची त्यांनी वर्तविलेली शक्यता व त्याची कारणमीमांसा.
'आक्रमण' ह्या कथेत त्यांनी सांगितलेला, फ्रेड हॉएल व चंद्र विक्रमसिंघे ह्यांचा, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या सुरवातिविषयीचा सिद्धांत. तसेच, पृथ्वी स्थिर नसून ती सूर्याभोवती फिरते हे स्वत:चे विधान सिद्ध करण्यासाठी गॅलिलिओने त्यावेळी दिलेला (चुकीचा) पुरावा आणि ह्यासाठी नंतर दिले गेलेले (योग्य) पुरावे.
'कृष्णकंद' ह्या कथेत त्यांनी समजाऊन सांगितलेली 'कृष्णपदार्थ' (विंप – विकली इंटरॅक्टिंग मॅसिव पार्टीकल) ची संकल्पना.
तसेच ह्या माध्यमाचा वापर करून, भविष्यकाळातील मानवाच्या संभाव्य वैज्ञानिक प्रगतीची झलक ते सहजपणे दाखून जातात. उदाहरणार्थ, 'प्रोजेक्ट सोलस्पेस' ह्या कथेत, उर्जेचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सुचविलेला उपाय.
जयंत नारळीकरांचे 'आकाशाशी
जयंत नारळीकरांचे 'आकाशाशी जडले नाते' हा माझा आवडता खगोल ग्रंथ व विज्ञान कथा असलेले 'व्हायरस' वाचल्यावर त्यांच्या बाकीच्या विज्ञानकथा वाचायला आवडतीलच. हे नवीन पुस्तक कळाले.
पण पुस्तकाबद्दल जरा विस्ताराने लिहा की राव, म्हणजे बाकीच्यांनाही आधिक माहिती मिळेल.