प्रकाशचित्रण

गाज सागराची — "मालवणमय"...

Submitted by जिप्सी on 6 January, 2013 - 00:12

=======================================================================
=======================================================================
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,

एक मस्त हिरवागार विकांत....

Submitted by विशाल कुलकर्णी on 3 January, 2013 - 03:43

पुण्याला आल्यापासून महिन्यातून एकदातरी आई-आण्णांना भेटण्यासाठी म्हणून सोलापूरची चक्कर होतेच. आधी मुंबईला असताना लांब पडत असल्याने हेच प्रमाण ४-५ महिन्यातून एकदा असं होतं. आता इथे कसं ऑफीस संपल्यावर निघालं तरी रात्री दहा-साडे दहा पर्यंत घरी पोहचता येतं. त्यामुळे घरचे दौरे वाढलेय. आईसाहेब खुश आहेत. प्रत्येक वेळी सोलापुरी गेलं की जुन्या मित्रांपैकी कुणाला तरी फोन करायचा, शक्य असेल तर सगळेच ठरवून एका ठिकाणी भेटायचं, किमान एकाला तरी भेटायचच असा नियम ठरवून घेतलाय मी आता. पण यामुळे झालं असं की नातेवाईक शिव्या घालायला लागले.

हडसर - निमगिरी

Submitted by इंद्रधनुष्य on 3 January, 2013 - 02:27

दिवाळी आधी रतनगड ट्रेक पार पडलेल्याला दिड-दोन महिन्याचा काळ लोटला होता. दिवाळी नंतर रोमाने भैरवगड तर योने सुधागड सर केला होता. मी ऐन वेळी 'कारणे दाखवा नोटिस' बजावून त्यातून काढता पाय घेतला होता. दोन महिने माझा ट्रेक उपास घडलेला असतानाच नाताळच्या लंब विकांतातील क्रॉसकंट्री ट्रेक रद्द झालेल्या यो आणि रोमाचा फोन आला. क्रॉस नाहितर नाही... निदान कंट्री ट्रेक तरी करुचा धोशा लावला होता. मंगळवार असल्याने एका दिवसाचा ट्रेक करायचा होता. जवळचा प्रबळगड करुया अशी टूम निघाली. त्याच काळात आमचा ट्रेक सवंगडी गिरिविहार फॅमिली सोबत जंगलात 'सफर' करत होता.

स्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...

Submitted by आनंदयात्री on 2 January, 2013 - 00:44

२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. घनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -



अ‍ॅट पोस्ट तेटली (बामणोली - तापोळा रस्ता) विथ कोयना बॅकवॉटर

Submitted by अतुलनीय on 1 January, 2013 - 04:28

डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटी माझ्या काही मित्रांसमवेत कोयना बॅकवॉटरच्या अगदी काठावर वसलेल्या एका अतिशय चिमुकल्या गावात जाण्याचा योग आला - "तेटली" असे इंग्रजी नांव असले तरीही गाव लहानच आहे. नावावरुन मला "टाटा टेटली" या चहाच्या कंपनीची आठवण झाली. असो.

माझं गाव नळदुर्ग...

Submitted by अर्चना पुराणिक on 29 December, 2012 - 06:55

माझं गाव नळदुर्ग...:) नळदुर्गची शान (किल्ला)...:) आणि माझ्या घराच्या आजुबाजूचा परिसर...:)

IMGP3425.JPGIMGP3419.JPGIMGP3415.JPGIMGP0821.JPGIMGP0875.JPG

जायचे होते 'तुंग' पोचलो 'तिकोना'ला !!!

Submitted by MallinathK on 28 December, 2012 - 01:01

सकाळ सकाळी ६.३० ला जाग आल्यावर कंटाळा येण्यासारखं काय असतं? तेही शनिवारी? पण तरी कंटाळा आला.
मग काय, मित्राला फोन करुन विचारले 'जायचे का कुठेतरी ट्रेकला?'
पलीकडुन एकच शब्द ऐकु आला 'चल'. बिच्यार्याला झोपेतुन सुद्धा निट जागे होउ दिले नव्हते. Proud

त्याला ४ वाजता काम असल्याने इथे नको, तिथे नको, हे नाही, ते नाही करत, ३ पर्यंत कसंही करुन परत यायचे ठरवुन जायचे पक्के झाले. आता ३ पर्यंत परत यायचे म्हणुन ठिकाण तैलबैला नको, घनगड नको, तिकोणा मी आधीच केलाय म्हणत म्हणत तुंगला जायचे ठरले.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण