पुण्याला आल्यापासून महिन्यातून एकदातरी आई-आण्णांना भेटण्यासाठी म्हणून सोलापूरची चक्कर होतेच. आधी मुंबईला असताना लांब पडत असल्याने हेच प्रमाण ४-५ महिन्यातून एकदा असं होतं. आता इथे कसं ऑफीस संपल्यावर निघालं तरी रात्री दहा-साडे दहा पर्यंत घरी पोहचता येतं. त्यामुळे घरचे दौरे वाढलेय. आईसाहेब खुश आहेत. प्रत्येक वेळी सोलापुरी गेलं की जुन्या मित्रांपैकी कुणाला तरी फोन करायचा, शक्य असेल तर सगळेच ठरवून एका ठिकाणी भेटायचं, किमान एकाला तरी भेटायचच असा नियम ठरवून घेतलाय मी आता. पण यामुळे झालं असं की नातेवाईक शिव्या घालायला लागले. त्यामुळे यावेळेस सोलापूरी गेल्यावर सगळ्यात आधी आमच्या आत्याबाईंसाठी वेळ काढायचं ठरवलं. खरंतर ही आत्या (सुमनआत्या) माझी लाडकी आत्या आहे. माझं लहानपण माझ्या आईपेक्षा आत्याच्या कडेवर जास्त गेलय त्यामुळे तिच्याकडे प्रथमपासुनच जास्त ओढा आहे माझा. यावेळी आत्याबाईंना भेटल्यावर तिने तिच्या शेतावर जायची टुम काढली.
सोलापूरपासुन ६० किमी वर असलेलं ’उडगी’नामक कन्नड गाव हे माझ्या आत्याचं सासर. तसे मामा प्रथमपासून सोलापूरातच असतात, पण गाव जवळच असल्याने ते स्वत:च शेतीकडे लक्ष ठेवुन असतात. तर यावेळी उडगीला जायचा बेत ठरला. घरातून सकाळी लवकर निघायचं. रस्त्यात आधी लागणार्या 'प्रज्ञापूरीत' (अक्कलकोट) थांबून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं असा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे माऊलींचे दर्शन घेवुन उडगी गाठले.
शेताच्या सुरुवातीलाच मामांचा जुना कोठा (वाडा) आहे. तिथे थोडा वेळ विसावलो. वाटेकर्याच्या कारभारणीने दिलेले चहा-पाणी घेवून भटकंतीसाठी निघालो.

समोरच हिरव्यागार उसाचं वावर पसरलेलं होतं. त्यातून वाट काढत पुढे निघालो.




उस संपला आणि जोंधळ्याची पट्टी सुरू झाली.




मामांनी यंदा शेतात एकुण सहा एकरावर उस, दोन एकर गहु, आठ एकर ज्वारी केलेली आहे. उपलब्ध पाणी उसालाच पुरे पडत नसल्याने जवळजवळ २४ एकर जमीन पडून आहे. नाही म्हणायला इतर काही कोरडवाहू पिके घेतलेली आहेत. पण ती तुरळक प्रमाणात.
गव्हाची नुकतीच जोम धरू लागलेली रोपं...

सद्ध्या रानात एकुण दोन विहीरी आहेत. तिसरीचं काम सुरू आहे...

नव्याने होवू घातलेल्या विहीरीच्या शेजारीच एक छोटीशी पत्र्याची शेड आहे. तिथेच बाहेर एका झाडाखाली चालून दमलेल्या स्त्री-वर्गाने बस्तान ठोकलं. आता पुढे येणार नाही, तुमचे तुम्ही या फिरून असं जाहीर करून दोन्ही धाकट्या (आत्या पण कुलकर्णीच आहे , म्हणून ती मोठी) कुलकर्णींजनी (सौ. सायली विशाल व सौ. कृपा विनीत (माझ्या धाकट्या भावाची पत्नी)) तिथेच सतरंजीवर बैठक घातली. पण आत्याने पुढे बोराची झाडे आहेत असे सांगितल्यावर त्यांचा बेत पुन्हा बदलला. तरी आलेला थकवा दूर करण्यासाठी म्हणून थोडा अस्सल रानमेव्याचा अल्पोपहार घेवून पुढे जायचे असे आत्याबाईंनी सांगितल्यामुळे दोघीही खुश झाल्या. अजुन हुरडा झालेला नसल्यामुळे मग कोवळी तूर, हरभरा (ढाळा), पेरू, बोरं अशा रानमेव्यांवर सगळेच तुटून पडलो.
ते संपल्यावर गड्याने उसाची मोळी समोर आणून टाकली.... (पुढे काय झाले ते कृपया विचारू नये, मला कुणीही अधाशी, हावरट म्हटलेले अजिबात आवडत नाही
)

छानपैकी पोटोबा झाल्यावर पुढच्या भटकंतीसाठी रवाना झालो. मामा शिक्षणाने सिव्हील इंजीनीअर. सद्ध्या सोलापुर टाऊन प्लानींगकडे डिपार्टमेंटमध्ये सिनीयर टाऊन प्लॅनर म्हणून कार्यरत आहेत.पण शेती ही पहिली आवड असल्याने तोपर्यंत ते अंगावरचे शहरी कपडे उतरवून कर्नाटकी पद्धतीची लुंगी चढवून, ती गुडघ्याच्या वर गुंडाळून घेवून जोंधळ्याच्या शेतात शिरले होते. तिथे लावलेल्या स्प्रिंकलरला काहीतरी समस्या आलेली होती. त्यांनी तिकडूनच हाक मारली. तिकडे जाताना मामांची खरी दौलत नजरेत आली...
हिच खरी दौलत !



पुढची पिढी...

आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत मामांनी आणि गड्यांनी खटपट करून स्प्रिंकलर चालू केलेला होता.


त्याच्या जवळुन जाताना नकळत अंगावर पाण्याचे ते तुषार उडाले आणि बायकांची धावपळ झाली. नाय, नाय.. पाण्यापासून दुर पळायची नाय, तर त्या स्प्रिंकलर्सच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन भिजण्याची. तिथे थोडावेळ पाण्यात (आणि पायाखालच्या चिखलात) मस्ती झाल्यावर पुढे निघालो. थोड्यात वेळात तिथे जाऊन पोचलो ज्यासाठी त्यांनी आपला बेत बदलला होता.



भरपूर बोरं खाऊन आणि गोळा करुन झाल्यावर मग पुन्हा मागे फिरायचे ठरले. कारण यापुढे बहुतेक जमीन रिकामीच होती पाण्याच्या अभावामुळे. तरीही येताना परत रस्त्यात आता काढायला आलेली तूर भेटलीच..


दुपारचे तीन वाजायला आले होते. भरपूर फिरल्यामुळे परत पोटात कावळे कोकलायला लागले होते. आत्याबाईंनी खादाडीचाही जंगी बंदोबस्त केलेला होता. बाजरीच्या पातळ कडक भाकरी, खरडा, शेंगदाण्याची चटणी, तेलमीठावर परतून घेतलेली कोवळी गवार, मेथीची सुकी भाजी, ढोबळी मिरच्यांची सुकी भाजी, मेथी-पालकची पातळ भाजी आणि शेवटी त्यांचं (कर्नाटकी लोकांचं) खास "चित्रान्न" असा जंगी बेत होता. तोंडी लावायला ढाळा, बोरं, पेरु असं अस्सल 'ग्रीन सलाद'ही होतंच.


खादाडी आटोपल्यानंतर तिथेच एका झाडाखाली मस्त सावलीत, गवतावरच जे ताणुन दिली ते थेट पाच वाजताच उठलो.

पुन्हा कोठ्यावर येवून गरमागरम चहा घेतला आणि हुरड्याला परत यायचं असं मनाशी पक्कं ठरवून परतीच्या वाटेला लागलो.
विशाल...
मस्त
मस्त
मस्त रे. हे गाव मैंदर्गीच्या
मस्त रे.
हे गाव मैंदर्गीच्या जवळ आहे का?
उडगी आडनावाचा एक मित्र आहे माझा. त्याचं गाव मात्र वळचण की कायतरी नावाचं अक्कलकोट रोडला आहे.
मस्त आहे... . . . मला कुणीही
मस्त आहे...
.
.
. मला कुणीही अधाशी, हावरट म्हटलेले अजिबात आवडत ना>>>>>>>> अजुन आहेत नाव
विश्ल्या जस्ट जेवून आले आणि
विश्ल्या जस्ट जेवून आले आणि तुझा मेनू पाहिला. पोटात पुन्हा कावळे कोकलायला लागले.
झक्या, ते ’वळसंग’ आहे. उडगी
झक्या, ते ’वळसंग’ आहे. उडगी आणि मैंदर्गी जवळ जवळच आहेत.

दक्षे, उदय
धन्यवाद मंडळी !
डोळे निवले अगदी.
डोळे निवले अगदी.
लै भारी रे मर्दा!!! चटणि भाकर
लै भारी रे मर्दा!!!
चटणि भाकर तर झक्कास.. अगदी तों पा सु
मस्त रे.. तुझे फोटु बघुन
मस्त रे..
तुझे फोटु बघुन गावची आठवण आली.
ते ’वळसंग’ आहे.>> बरोब्बर
ते ’वळसंग’ आहे.>> बरोब्बर आहेस.
मला खादाडीचे फोटु बिटु काय दिसले नैत बा..
व्वा!! लक्की यु आताच गावी
व्वा!! लक्की यु
आताच गावी जावसं वाटतय.
मस्त रे!
मस्त रे!
वा. मस्त विशाल्भौ. पण आपली
वा. मस्त विशाल्भौ.
पण आपली भेट राहिलीच....
तु फोटो पाठ्विलास तेंव्हाच लक्षात आले होते की लेख्/ललित पडणार.
नेहेमीप्रमाणे अप्रतिम लिखाण.....
असे वाटले माझ्या घरचेच लोक आहेत.
@मुग्धानंद : पुढच्या वेळी
@मुग्धानंद : पुढच्या वेळी ठरवुनच जावुयात
धन्यवाद मंडळी !
झक्या
वॉव..शेतातला मेवा जबरदस्त
वॉव..शेतातला मेवा जबरदस्त दिस्तोय.. आणी शेतावर पिकनिक... लक्की यू विकु!!!!!
आणी तू असले फोटो टाकलेस जीवघेणे..
भाकरी खाऊनच कित्येक वर्षं झालीत
विकु, मस्तच रे.
विकु, मस्तच रे.
आ हा हा हा - काय तों पा सु
आ हा हा हा - काय तों पा सु फोटो आहेत - जीवघेणेच - कस्ला करेक्ट शब्द वापरलाय वर्षुतै ने - अस्सल चायनीजच....
लै भारी....
झक्कास... विकांत सत्कारणी
झक्कास...
विकांत सत्कारणी लागला...
भाकरी चे फोटो कातील आहेत///
भाकरी चे फोटो कातील आहेत///
मी पण सोलापुरात होतो मागचा
मी पण सोलापुरात होतो मागचा आठवडाभर. नेक्ष्ट टाईम भेटू
सहीच
सहीच
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
विशाल, काय फोटो आहेत !!!
विशाल,
काय फोटो आहेत !!! पूर्ण वातावरण उभे केलेत. oasis .....
शेवटून तिसरा फोटो बघुन
शेवटून तिसरा फोटो बघुन
मस्त रे विशाल
मस्त रे विशाल
प्रचि व वर्णन दोन्ही आवडले
प्रचि व वर्णन दोन्ही आवडले
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
फिरा फिरा पण एकही गटग अटेंड
फिरा फिरा पण एकही गटग अटेंड करु नका

भारी फोटू
विशाल... तुला माहीत नसेल तर,
विशाल...

तुला माहीत नसेल तर, आता सांगून ठेवतो - मला कॉपी-पेष्टायचा भयंकर राग येतो. तू, जिप्श्या, योग्या, इन्द्र्या... तुमच्या धाग्यांना सुरुवातीला नविन होतो तेव्हां, कुतुहलाने प्रतिसाद द्यायचो... पुढे-पुढे लेख वेगळे पण तेच-ते प्रतिसाद पडायाला लागले म्हटल्यावर राग यायला लागला... आरे कधीतरी 'वाईट' तरी लिहून बघा... म्हण्जे माझ्या सारख्याला वेगळा 'प्रतिसाद' देता येईल... जमत नसेल तर, लेख प्रसिद्ध कराल त्याच दिवशी माझा 'पयला प्रतिसाद पडला' मानून पूढे चालू लागा...
आता नेहमीचा प्रश्न: - सध्या मु.पो. कुठले आहे?... आणि तुला काय 'कुडाळा'त फक्त 'गवळ्देव'च दाखिवला काय?... बाकीच्या फोटुंचं काय केलंस?, ते सांग आधी...
मस्त खादाडी आटोपल्यानंतर
मस्त

खादाडी आटोपल्यानंतर तिथेच एका झाडाखाली मस्त सावलीत, गवतावरच जे ताणुन दिली ते थेट पाच वाजताच उठलो. >>>>>>>>>>>>>> किती सुख ते
@विवेक देसाई : दादानू, खरेतर
@विवेक देसाई : दादानू, खरेतर तो सगळाच अनुभव लिहायची खूप इच्छा होती पण मोह टाळला. अर्थात माझ्याकडे नोंद राहावी म्हणून, माझ्या ब्लॉगवर नक्की लिहीन मी फोटोंसहीत . इतरत्र कुठे प्रकाशित नाही करणार पण. लिहीले की तुम्हाला लिंक पाठवेनच
धन्स अंकु !!
Pages