अ‍ॅट पोस्ट तेटली (बामणोली - तापोळा रस्ता) विथ कोयना बॅकवॉटर

Submitted by अतुलनीय on 1 January, 2013 - 04:28

डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटी माझ्या काही मित्रांसमवेत कोयना बॅकवॉटरच्या अगदी काठावर वसलेल्या एका अतिशय चिमुकल्या गावात जाण्याचा योग आला - "तेटली" असे इंग्रजी नांव असले तरीही गाव लहानच आहे. नावावरुन मला "टाटा टेटली" या चहाच्या कंपनीची आठवण झाली. असो.

येथे सातारा वा महाबळेश्वर येथुन जाता येते. सातार्‍यातून कास पठार, कास, बामणोली मार्गे ४५ कि.मी. सातार्‍यापासुन तेटली पडते. (बामणोलीच्या पलिकडे (तापोळा रस्त्यावर १० कि.मी. वर). तर महाबळेश्वर मधून तापोळ्याच्या अलिकडे २ कि.मी. वर बामणोली फाटा लागतो. तापोळा बामणोली हे रस्त्याने अंतर ४५ कि.मी. आहे. ४/५ वर्षांपूर्वी हा रस्ता झाला आहे. एकदम सुंदर सॄष्टीसौंदर्य असलेली हा रस्ता आहे. तर बामणोलीच्या अलिकडे (तापोळ्याकडून गेल्यास) १० कि.मी. वर तेटली लागते.

गंमत म्हणजे बॅकवॉटरमधुन लाँचने गेल्यास - बामणोली तापोळा अंतर ४ ते ५ कि.मी. आहे (वेळ ३०/३५ मिनीटे) तर तेटली च्या बरोबर समोरच तापोळा दिसते - अंतर १/१.५ कि.मी. पुष्कळ लोक तापोळ्याला गाडी पार्क करुन लाँचने तेटली येथे येऊन आम्ही राहिलो होतो त्या जलतारा रेसॉर्टवर येऊन जेऊन जात होते.

तर आता वर्णन बास, प्र.चि. पहावीत. तुम्हाला नक्कीच जावेसे वाटेल. Happy

प्र. चि. १

AAP_2.JPG

प्र. चि. २

AAP12.jpg

प्र. चि. ३

AAP1.jpg

प्र. चि. ४

AAP4.jpg

प्र. चि. ५

AAP3.jpg

प्र. चि. ६

AAP5.jpg

प्र. चि. ७

AAP13.jpg

प्र. चि. ८

AAP6.jpg

प्र. चि. ९

AAP7.jpg

प्र. चि. १०

AAP8.jpg

प्र. चि. ११

AAP_7.JPG

प्र. चि. १२

AAP_8.JPG

प्र. चि. १३

AAP11.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

छान ! <<एकदम सुंदर सॄष्टीसौंदर्य असलेली हा रस्ता आहे.>> ह्याचे पण येउद्यात प्र.ची. Happy

मस्त Happy

काही फोटोंची साईझ छोटी का ठेवली आहे??? >>>
काही फोटोंची साईझ छोटी का ठेवली आहे??? >>>> +१

>>> शा. गं. , स्निग्धा - साईझ आता प्रॉपर केला आहे. धन्यवाद.

माझ्या माहितीपमाणे ते "तेटली" आहे.... फोटो मस्त!
>>> हो, स्वरुप - ते तेटलीच आहे, बदल केला आहे - धन्यवाद.

अतुल.... तुमचे जुने फोटो बघता हे फोटो खरच नाही आवडले. तुमच्याकडून अधिक छान फोटोंची अपेक्षा असते. आहे. आणि असेल. Happy

गैरसमज नसावा... धन्यवाद.

अतुल.... तुमचे जुने फोटो बघता हे फोटो खरच नाही आवडले. तुमच्याकडून अधिक छान फोटोंची अपेक्षा असते. आहे. आणि असेल.

गैरसमज नसावा... धन्यवाद.

>>>> गैरसमज अजिबात नाही, कदाचीत १३० के.बी. च्या मर्यादेमुळे फोटोंची क्वॉलीटी खूपच डिटीरीओरेट झाली आहे. तुम्ही हेच फोटो फेसबुक वर पहा. तुम्हाला नक्की आवडतील याची खात्री आहे. किंवा नंतर मी तुला पिकासा लिंक शेअर करीन Happy