भटकंती

कर्नाटक टुर ऑपरेटर अथवा ड्राइव्हर

Submitted by निर्देश on 28 March, 2022 - 14:52

जून मध्ये कर्नाटक मधील प्रेक्षणीय स्थळे (बंगळुरू , मैसूर , हंपी , उडुपी , मुरुडेश्वर इत्यादी ) पाहण्याचा विचार आहे. तेथील टुर ऑपरेटर अथवा ड्राइव्हर चा रेफरंस / रेकमेंडेशन असल्यास कृपया मेसेज करून कळवाल का. धन्यवाद.

भैरवगड ते कात्राबाई भटकंती

Submitted by अजित केतकर on 18 March, 2022 - 07:27

एकेक गड किल्ल्यांची भटकांत्या आजवर केल्या होत्या पण रेंज ट्रेक काही झाला नव्हता. तसेच आजपर्यंत सगळ्या भटकंत्यांमध्ये खानपान गावकऱ्यांकडून घेतले होते त्यामुळे लाकडं गोळा करून, चूल पेटवून स्वंयपाक करण्याची मजा अजून घेतली नव्हती. चंद्रकोर ट्रेक्स या समूहाच्या भैरवगड ते कात्राबाई अशी रांग भटकंती ची माहिती मिळाली आणि ही संधी सोडायची नाही असें ठरवले. हा ग्रुप बरीचशी व्यवस्था आपली आपणच करतो आणि खर्च वाटून घेतो, त्यामुळे खूप स्वस्तात आणि स्वावलंबी भटकंती होते.

विषय: 

गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस ३ झोंगरी

Submitted by आशुचँप on 10 March, 2022 - 15:18

https://www.maayboli.com/node/80987
पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80996
पूर्वार्ध २
https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन
https://www.maayboli.com/node/81122
दिवस २ - छोका

================================================================

विषय: 

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १५ (अंतिम): हिमालयातून परत...

Submitted by मार्गी on 9 March, 2022 - 05:41

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १४: थरारक पाताल भुवनेश्वर

Submitted by मार्गी on 2 March, 2022 - 06:07

गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस २ - छोका

Submitted by आशुचँप on 19 February, 2022 - 13:08

https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन

====================================================================================

विषय: 

सायकल यात्रा - पूणे - मोरगाव - नारायणपूर

Submitted by विजयश्रीनन्दन on 15 February, 2022 - 01:14

पुणे - कुरवपूर सायकल यात्रा संपन्न झाली होती. २६ जानेवारी रोजी अतुलजी सुबंध आणि प्रफुल्ल जी डांगे अभिनंदन करण्यासाठी घरी आले होते. चहा पिताना मोरगाव निवास करण्यासारखी सायकल यात्रा करावी असं प्रफुल्लजींनी सुचवलं.
१२-१३ फेब्रुवारी चा विकेंड निवडला गेला. शनिवारी अतुलजींचा हाफ डे ऑफिस. मग संध्याकाळी निघायचं, रात्री चा मुक्काम, सकाळी दर्शन घेऊन परतीची वाट धरायची अस ठरलं. या वेळी श्रेयस सिद्धपाठकी पण येणार होते. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच सायकल स्वारी होणार होती. प्रफुल्ल जींचा कोकण यात्रेचा अनुभव, अतुलजींचा पंढरपूर यात्रेचा अनुभव गाठीशी होता.

विषय: 
शब्दखुणा: 

सुट्टीत फिरायला जाताना गेंडा विमानातून कसा न्यावा ?

Submitted by शांत प्राणी on 7 February, 2022 - 11:01

पाळीव प्राण्यांच्या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण तिथे रागवल्याने नवीन धागा.
अ) नेहमीपेक्षा वेगळे प्राणी पाळण्याची आवड असलेल्यांना येणारी समस्या म्हणजे सुटीत बाहेर फिरायला जाताना काय करावे ? मी एक पाणघोडा आणि गेंडा पाळण्याच्या विचारात आहे. सुटीत आम्ही हिमालयात फिरायला जातो. आमचा पाळीव प्राणी सोबत न्यायचा झाल्यास काय करावे लागेल ? तसेच हॉटेल, रिसॉर्ट, बंगला यापैकी त्याची सोबत राहण्याची सोय कशी होईल ? प्रेक्षणीय स्थळे पहायला जाताना त्याला सोबत कसे न्यावे कि त्या ठिकाणी त्याच्यासाठी विरंगुळा केंद्रे असतात ?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

शब्दखुणा: 

गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस पहिला - साचेन

Submitted by आशुचँप on 5 February, 2022 - 13:48

दुसऱ्या दिवशीची पहाट उगवली तीच लगबगीने. कुणीतरी दार ठोठावत होते. कुणीतरी उघडले, कुणीतरी सांगितले सब को तयार होने के लिये बोला है, ओर चाय पिने के लीये आ जाव. कुणीतरी म्हणाले, ठीक है आते है. परत दार लावल्याचा आवाज. पण त्यातल्या चाय शब्दाने माझी झोप उडाली. एरवी मी तसा कॉफी प्रेमी पण बाहेर गेल्यावर विशेषत ट्रेकला तर मग चहा ( त्याचे कारण ट्रेकवर कधीच चांगली कॉफी मिळत नाही हेही आहे). मोठ्या अनिच्छेने ते उबदार पांघरूण दूर करून उठलो, आणि रुमबाहेर आलो तर एकदम शिरशीरी आली. चांगलाच गारठा होता बाहेर. तसाच हाताची घडी करून कँटीन कडे गेलो, तिथे एकजण गरमागरम चहा स्टीलच्या कपात ओतून देत होता.

विषय: 

८ इति किलीमांजारो अध्याय सुफळ संपूर्ण

Submitted by वाट्टेल ते on 3 February, 2022 - 09:28

गिलमन पॉइंटला ९:३० ला फक्त मीच पुढे उहूरुपर्यंत जाऊया म्हणून उत्साहात होते, बाजूला रिम दिसत होते आणि खुणावत पण होते. निलाद्री आधी उत्साहात दिसला पण नंतर नको म्हणाला. परांजप्यांनी अख्खा ट्रेक गाऊटमधला ग सुद्धा उच्चारला नव्हता, पण तरी ते ही नको म्हणाले. शक्य असते तर मी त्यांना "You too Brutus ?" म्हटले असते. या क्षणीसुद्धा डेविड आणि वॉलेस यांची पुढच्या वेळेबद्दल आणि अंतराबद्दल एकवाक्यता नव्हती. तरी फार तर १ दीड तास अजून . माध्यान्हीच्या आधीच तिथे पोहोचले असते. परत यायला २ तास, किबो हट पर्यंत उतरायला २-३ तास. पुढे होरोम्बोला १२००० फुटांपर्यंत उतरेपर्यंत अजून ३ तास.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती