भटकंती

हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग २ सुओमेनलिना (suomenlinna) समुद्री किल्ला

Submitted by निर्झरा on 9 July, 2018 - 06:57

https://www.maayboli.com/node/66689 भाग १
Suomenlinna fort.jpg
फोटो जालावरून साभार
फेरीबोट मधून जाताना दिसणारे हेलसिंकी बंदराचे दृष्य.
CIMG1538.JPG
बंदरावर बांधलेल्या तलावात पोहण्याचा आणि सौना बाथ घेण्याचा आनंद घेताना तेथिल लोक.
CIMG1543.JPG

हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग १

Submitted by निर्झरा on 6 July, 2018 - 05:21

अगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले, तर नवरा कामानिमित्त फिनलँड येथे गेला आणि मग आमचे, म्हणजे माझे आणि मुलाचे तिकडे जाण्याचे ठरले. तयारी सुरु झाली. नवर्‍याची कंपनी जरी सगळ करणार होती तरी एवढा लांबचा प्रवास एकटीने करण्याचे धाडस मलाच करायचे होते. आता तुम्ही म्हणाल त्यात एवढ काय? पण माझ्या बाबतीत खरी गंमत ही की माझा आणि ईंग्रजी भाषेचा शाळेत असल्यापासून छत्तीसचा आकडा आहे तो अजूनही आहे. त्यात पुण्याच्या डेक्कन परिसराहून अधिक लांब कुठेच एकटी फिरले न्हवते. त्यामुळे माझ्या समोर पहिला प्रश्न होता तो एकटीने प्रवास करण्याचा आणि व्हिसा ऑफिस मधे समोरच्या माणसा बरोबर मी काय आणि कसे बोलणार याचा.

शब्दखुणा: 

‘माथेरान’ व्हाया ‘पिसारनाथ’ आणि ‘वन ट्री हिल’

Submitted by योगेश आहिरराव on 4 July, 2018 - 03:35

‘माथेरान’ व्हाया ‘पिसारनाथ’ आणि ‘वन ट्री हिल’

विषय: 

माझा आजोळ बेळगाव २

Submitted by वेन्गुर्लेकर on 3 July, 2018 - 06:31

बेळगाव म्हटलं कि खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनाभोवती रुंजी घालू लागतात. कॅलिडोस्कोप सारखा वेगवेगळ्या आठवणी,माणसं ,जागा ,चवी नॉस्टॅल्जिक बनवतात .

माझं आजोळ बेळगाव

Submitted by वेन्गुर्लेकर on 3 July, 2018 - 05:52

एप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन .

इगतपुरी ते बालाजी

Submitted by pravintherider on 2 July, 2018 - 23:36

नमस्कार ,

तुम्हा सर्वांची मदत हवी आहे .
ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी ते तिरूपती बालाजी कार ने जाण्याचा प्लन आहे. एकुण पाच जण आहोत.
इगतपुरी - पुणे- सोलापुर-गुंतकल- कडप्पा- तिरूपती.
परत येताना तिरूपती - हुबळी-कोल्हापुर-पुणे - इगतपुरी
1) रस्त्यांची स्थिती
2) या व्यतिरिक्त जवळ चा मार्ग आणि मुक्कामा साठी हाँटेल.
3) रस्त्यामध्ये येणारी स्थळे. (कर्नाटक मधिल)

धन्यवाद.

वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार

Submitted by hemantvavale on 30 June, 2018 - 06:04

तरुण, उत्साही पर्यटक

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर- कळसुबाई

Submitted by राजेश्री on 24 June, 2018 - 10:54

कळसुबाई

Pages

Subscribe to RSS - भटकंती