लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली
तृण वेचून खोपा बांधला
वर्तीकेने इवलासा संसार थाटला
शस्य शोधावया नर भ्रमणास जाई
जननी आगंतुकांच्या सोहळ्याची वाट पाही
कालानुपरत्वे सोहळे झाले
खोप्यामध्ये इवलेशे जीव आले
किलबिलाट उपवनी माजे
काकांची मत्सरी ईर्ष्या जागे
चिऊ सज्ज रक्षणास ठाकली
झुंज नाही सोडली
लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली
निष्ठुर काक नि ती इवलीशी पिल्ले
घरट्यावर त्यांनी सुरु केले ते हल्ले
जननी उभी सरसावुनी चोच ,
चोचीला अशी काही धार जी चढली
पडली धडपडली पण लढली अशी कि
काकांवर जणू विद्द्युल्लता कडाडली