चणे खाऊन , साजरी दिवाळी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 22 August, 2019 - 08:56

पाव किलो चणे खाऊन

केली साजरी दिवाळी

मस्त फटाके फोडत सुटलो

हैराण झाले शेजारीपाजारी

पहिली आंघोळ येण्याआधीच

भिजवून ठेवले पाण्यात

मोड येऊनि मग हादडले

मजा आली पादण्यात

पुकपुक पुकपुक खेळ सुरु तो

बोंबलत सुटला *चा

पोलीस आले तरी थांबेना

मग झाला मोठा लोचा

उचलून टाकलं गाडीत मजला

तिथेही सोडली घाण

कसं घेऊनि जायचं याला ?

म्हणुनी पोलिसही परेशान

पुढे जाउनी शक्कल केली

त्यांनी घुसवला मागून कापूस

चणा धावला मदतीला ऐसा

जणू सर्वांचाच तो बापूस

कोंडूनी वायू पॉट फुगले

पुढे आला स्पीड ब्रेकर

खालून बंद म्हणून सारे वर आले

मग देत सुटलो ढेकर

क्षमायाचना मागत सुटले

पोलीस आले काकुळतीला

पुरे आता छळने आम्हाला

थांबवा वायूगळतीला

अहो पादून पादून मीच थकलो

तरी थकला नाही *चा

मलाच कळत नाही काय झाले आत

नक्की झालाय कुठे लोचा ?

एक म्हातारा हुशार निघाला

दिलं हिंगाचं पाणी प्यायला

सुईईईई फट करुन आवाज आला

मग गेलो हळूच आडोश्याला

तोंड लपवुनी मग बैसलों घरात

पाद्र्या चर्चेची आली लाट

दिवाळी चांगलीच अंगाशी आली

त्या चण्यांनी लावली वाट

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

==)) ==))
धन्यवाद डीजे साहेब आणि अक्कू साहेब तुम्हालाही धन्यवाद बरे का ... ==)) चालतं ओ , कधी कधी ,, कराव्यात अश्या कल्पना कराव्यात .. आणि तसेही मला हि पटकन सुचली आणि टंकली कि सोडून दिली आंजावर ,, सुवासिक बनलीय असे वाटते ..

चण्यापेक्षा वालाच्या भाजीने सर्वात जास्त गॅस होतो. असे वाचले आहे. पादऱ्यांना पोलिस उचलून नेतात हे वाचून कीव आली पोलिसांची. पोलिस कापूस नाही दंडुका वापरतील असं माझं मत आहे.

==)) पादण्यासाठी दंडुका हा तर अन्याव हाय ठाकूर ... हा तर हक्क हाय ठाकूर .. हक्क हाय .. पोलीस शेजाऱ्यांनी तक्रार केली म्हणून उचलायला आले आणि स्वतःच वैतागून गेलेत .. म्हणून तर त्यांनी गयावया केलेल्या आहेत . आणि तशीही कल्पना हाय राव .. भाजी खा नाहीतर भाजी खा पण मनमोकळेपणाने पादावे.. ढुसक्या नकोत राव ... सुईईईईईई फॅट असा आवाज आला पाहिजे .. काय म्हणता .==)))==))

घ्यावा म्हणतो मी

थोडा तरी, कधी तरी, वास घ्यावा

शांत बैसोनि एका कोपऱ्यात

हळूच मागून हात फिरवावा

खाजवुनिया दोन *पारीत

त्याच बोटांचा वास घ्यावा

कैसे वाटते आता ?

कुणासही इचारू नये

फाट्यावर मारावे यथेच्छ

त्यालाही थोडासा त्रास द्यावा

घ्यावा म्हणतो मी

थोडा तरी, कधी तरी, वास घ्यावा

कोण म्हणते होत नाही आमचा टाईमपास

चला होऊया सहभागी या वासांदोलनात

दहापैकी कुठलेही एक आवडते घालावे आत

मस्तपैकी घ्यावा नाकाने वास

घ्यावा म्हणतो मी

थोडा तरी ,कधी तरी, वास घ्यावा

सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर

एक अलिप्त कोपरा शोधावा

एक म्हण आठवली - 'पादर्‍याला पावट्याचे निमित्त..!' Biggrin Biggrin Biggrin

नवीन Submitted by DJ.. on 23 August, 2019 - 05:35
>>> पादऱ्याला चण्याचे निमित्त. Lol

घ्यावा म्हणतो मी

थोडा तरी ,कधी तरी, वास घ्यावा

सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर

एक अलिप्त कोपरा शोधावा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 23 August, 2019 - 05:49>> हे इथे का लिहिलेत..? नवीन धाग्यात लिहा..

==)) चालते ओ डी जे साहेब ,, प्रतिसादांमध्ये मज्जा आली म्हणून लिवले.. खरंच मला वाटलं नव्हतं इतके भरभरून पिरेम मिळेल ते .. धन्यवाद .. पुन्यांदा काही तरी जगायेगळं टाकेन .. त्यो वर बसलाय ना त्याचीच किरपा दुसरं काय बी न्हाय बघा ...

==)) तुम्हाला हे नाव आवडेल का ? पाध्येश्वर पादनकर

==)) येतं असंच कधी कधी , अधि मधि , पण येत एवढं नक्की