मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?
मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?
मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये
तुझ्याकडून गिफ्ट आलेलं
पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं
फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा
नंतर कळलं तुझं लग्न आणि तुला झालेली मुलं
हादरून गेलो उभाआडवा , काहीच सुचलं नाही
लक्षच लागत नव्हते माझे , सारखा स्कीनवर बघत राही
त्या एका गिफ्टने बदलवून टाकले पूर्ण जीवन माझे
समजत होतो मीच स्वतःला प्रेमनगरीचे राजे
सत्य समजता डोळ्यावरची पापणीही लवत नव्हती
राजेशाही कोलमडून पार झोप उडाली होती