लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली

Submitted by सिद्धेश्वर विला... on 20 July, 2019 - 10:30

तृण वेचून खोपा बांधला

वर्तीकेने इवलासा संसार थाटला

शस्य शोधावया नर भ्रमणास जाई

जननी आगंतुकांच्या सोहळ्याची वाट पाही

कालानुपरत्वे सोहळे झाले

खोप्यामध्ये इवलेशे जीव आले

किलबिलाट उपवनी माजे

काकांची मत्सरी ईर्ष्या जागे

चिऊ सज्ज रक्षणास ठाकली

झुंज नाही सोडली

लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली

निष्ठुर काक नि ती इवलीशी पिल्ले

घरट्यावर त्यांनी सुरु केले ते हल्ले

जननी उभी सरसावुनी चोच ,

चोचीला अशी काही धार जी चढली

पडली धडपडली पण लढली अशी कि

काकांवर जणू विद्द्युल्लता कडाडली

पिल्लांच्या रक्षणास चिऊ सरसावली

धूर्त नजरांस नजर भिडवुनी

इवलेशे ते पंख फडकावूनी

वीरांगना एकटी काकांसी भिडली

लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली

गलबला बहुत , समर चाले बहुत वेळ

उपवनात समराची जणू लाली वाढली

प्राणाहुनी प्रिय ती बाळे ,

लढत राहावे मिटेपर्यंत डोळे

ऊर्जा तेथूनच तिने घेतली

चोच तलवार बनुनी चालू लागली

तगमग धडपड बघुनी साळुंकी धावली

विरांगनेसहित लढू लागली

धैर्य सामर्थ्य वाढता लढाई तुंबळ झाली

अन काकांच्या रुधीराने शांत झाली

लढली अशी कि जणू झुन्जीतच वाढली

पण पिल्ले वाचवली . पिल्ले वाचवली

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

=====================================

हा खरा घडलेला प्रसंग आहे .. याचिदेहीं याची डोळा मी पाहिलेला .. आमच्या सोसायटीत , एका चिमणीच्या घरट्यावर कावळ्यांनी हल्ला चढवला .. मी पण दगड मारून तिला मदत करत होतोच पण ते कावळे काही पाठ सोडायला तयार नव्हते .. काही साळुंक्या मदतीला धावून आल्या आणि ती पिल्ले बचावली ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults