अंबानींची फणी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 28 February, 2020 - 05:27

उदघाटनाला आला कोण ?

उद्योगपती सम्राट अंबानी

स्टेजवर जाताना ठेच लागली

त्यांची पडली खाली फणी

डोळे चुकवून पटकन उचलली

घेऊन गेलो घरी

लक्ष्मीपतीची फणी आणेल

संपत्ती आपल्या दारी

कामधंदे सोडून सारे

फणी पुजू लागलो

रोज धुपारती शंख वाजायचे

वाहायचो भरपूर फुले

येड लागलं बापाला आपल्या

हसत होती माझी मुले

हसत हसत सांगून टाकले

शेजारीपाजारी जाऊन

इमारतीतले गोळा झाले

वॉचमनापासून सारे झाडून

चर्चा वाढत गेली अन मी

गल्लोगल्ली फेमस झालो

फणीमातेचा भक्त म्हणोनि

शहरात प्रसिद्धी पावलो

हीच संधी मी साधुनी ठरवलं

भरायची आपली तिजोरी

फणिमता हि पावते त्याला

जो तोरण बांधतो तिच्या दारी

दार आपले , घर आपले

फणीही माझीच होती

भक्त आंधळे अन बहू लोचट

त्यांना अक्कल कमीच होती

वाढत गेले भक्तगण

काहीकाळातच बनला त्यांचा सागर

अंबानी खरंच धन्य बाबा तो

फणीपण भरते पैशाने घागर

=============================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults