लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 18 February, 2020 - 02:50

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

निर्व्यसनी असाल तर नको नको ती सवय लावून घ्यावी

कधी तंबाखू चोळावा निवांत तर कधी दारू ढोसावी

जर सर्व ठीक आले ,, तरच बायको करावी

अन्यथा बोहल्यावर चढू नये

चढल्यावर तोंडावर पडू नये

यातून अखेरपर्यंत सुटका नाही

हेच सत्य मानून , खालील पध्द्त अवलंबावी

व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा

हातातल्या लिटमस कागदावरी

बघावे सामूचे मोजमाप नीट

बायको येण्यापूर्वी घरी

जर सामू आला सात

खुशाल आपली काढावी वरात

जर त्यामध्ये असेल चढउतार

थेट घ्यावी सरळ माघार , लग्नकार्यातुनी

सवयीनुसार सामूची वर्गवारी

तंबाखू असे तीनवरी

सुपारीसहित तोच बसे पाचावरी

सोडामिश्रित आठवरी तर

ऑन दि रॉक्स ती दहावरी

देशीसाठी नसे चाचणी

कारण देशी असे जनावरी

लक्षात ठेवा नवरोबानो

अर्धांगिनी पण लिटमस परी

सुटणार नाहीत नाद कुणाचे

मग असाल तुम्ही रडारवरी

व्यर्थ नका मरू दादा

घ्या आधी लिटमस पेपर साधा

व्यसनांती पण सामू सात असेल

तरच निवडा आपली राधा

जर हे सर्व व्यवस्थित असेल

तर आणि तरच बोहल्यावर चढा

नाहीतर रामदास स्वामींप्रमाणे

सावधान ऐकताक्षणी सरळ मंडपाबाहेर पडा

==================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

मराठी शाळेत सामु शिकवला होता
सामु म्हणजे पी एच