शिल्लक

Submitted by पुरंदरे शशांक on 2 August, 2018 - 08:18

शिल्लक

अलंकारूनी शब्द जमविले
लिहिन म्हटले मनातले
मनात होते नीटनेटके
लिहिताना ते भरकटले

जीवनातली सारी फरफट
शब्दी येता डगमगली
सुखदुःखाची गाणी सगळी
कागदावरी ओघळली

उरले हाती काय पहातो
चमकूनिया डोळे दिपले
क्षण प्रेमाचे जे मोलाचे
स्नेहमाखले लखलखले...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

एक शंका: शब्दी येता की शब्दा येता?

मला शब्दी ठिक वाटते.
शब्दी: शब्दात, शब्दांमध्ये
शब्दा: शब्दाला
मला निटसे नाही सांगता येत पण काहीसे असे.

छान...