तुळस

माझ्या बाबाची तुळस

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 March, 2023 - 09:56

अंगणात वृंदावन
त्यात तुळस देखणी
वारीयाने पान हाले
विठ्ठलाचे संकिर्तनी

जरी बाबा परलोकी
येतो पहाटे उठोनी
प्रात:स्नान उरकोनी
घाली तुळसीला पाणी

मग जागतो मुकुंद
दारी वाजता मृदंग
बाबा नाचतो अंगणी
मुखी तुक्याचा अभंग

असे रोजचेच चाले
बाबा विठूसंगे डोले
बघताच तुळसीला
मन वारकरी झाले

पान तुळसा माईचे
बाबा प्रसाद सेवतो
दुःख सागर संसार
विठू पैलतीरा नेतो

तोच क्रम रोजचाच
परी उत्साह आगळा
तुळसीच्या वृंदावनी
वेणूनादी घननीळा

शब्दखुणा: 

कत्तलीसाठी जनावरे : सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला (पुन्हा एकदा) सणसणीत चपराक.

Submitted by आ.रा.रा. on 11 July, 2017 - 23:00

तुघलकी व विचित्र निर्णय घेणार्‍या सध्याच्या सरकारला पुन्हा एकदा कोर्टाने फटकारले आहे.

http://in.reuters.com/article/cow-cattle-trade-slaughter-rules-india-idI...

भाकड जनावरे विनाकारण पोसायला भाग पाडणार्‍या 'कत्तलीसाठी जनावरांची विक्री करायला बंदी' घालणार्‍या शासनाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने लगाम घातला आहे.

यासोबतच गोराक्षसांचंही काहीतरी करायला पाहिजे असे वाटते.

Subscribe to RSS - तुळस