तो येता राहिल

Submitted by लुक्या on 26 July, 2011 - 04:46

कोणीही निवडून आले तरी हे असेच होईल

तो येता
( चाल---- जन पळभर म्हणतील हाय हाय )

तो येता होइल कार्य काय
जन दिनभर रडतील धाय धाय ....

महाला वरती महाल उठतील
शेतकर्‍यांची घरे खंगतील
मोह फुलांच्या बागा फुलतील
ज्वारी बाजरी रोज भरडतील
मदिरेचे ते पाट वाहतील ... तो येता ....

नाजुक पायी चाळ बांधतील
शृन्गारिक अती लावणी गातील
वदनांमध्ये विडे रंगतील
रतन मंच की शैय्या सजतील
असहाय्य जन मग त्यात पोळतील .... तो येता ....

झोपडवासी माता भगिनी
कार्ड घेऊनी रांग लवतील
कार्डावरती काय मिळवतील
धान्या मधले किडे निवडतील
घासलेटचे डबे हालवित घरी परततील..... तो येता

गुलमोहर: 
शब्दखुणा: