पोळी, भाजी, ठेचा!

Submitted by उमेश कोठीकर on 18 July, 2011 - 03:02

प्रेरणा..(http://www.maayboli.com/node/27286#new)

पोळी

शहरातल्या पोळीसारखी
लुसलुशीत वाटते का मी?
अस्सं?
हा तळहात बघितलास?
गावाकडच्या चुलीवरच्या भाकरीसारखा
नक्कीच आहे ना?
एक झापड खाऊन बघ
नाचशील तनतनतन!
**********************************************
भाजी

मान्य आहे लग्नाच्यावेळी
भोपळा असलेली मी
आता भोपळ्यावर भोपळा झालीय

मला भोपळा मार्केट म्हणतांना
जवळ असतांना पाहिलेस
तर तूही भोपळ्यात खोचलेल्या
उदबत्तीसारखा दिसशील!
****************************************************

ठेचा

कधीतरी लग्नाकार्याला
मेकअप छान वाटतो

मेकअपशिवाय माझ्यातल्या चुडैलला
तुझ्यातला समंधच आवडतो!

गुलमोहर: