तुझ्याविना

Submitted by रमा-रातराणी on 6 July, 2012 - 09:46

ल्यायली नयनात जी, फक्त काळी रात्र होती,
आंधळी अन घुसमटती, सय तुझी रे मात्र होती,
मज पिसारे का मिळाले, कापलेले मोर जेव्हा,
माझिया उरात तेव्हा, एकटी लांडोर होती.

गुलमोहर: 

बरी आहे
अजून जरा मोठी असती तर अजून बरे झाले असते
कविता करताना एखाद्या विशयाचे सखोल चिन्तन करून ते करता करता त्या कल्पनेचा विस्तार योग्य दिशेने कारावा लागतो...... म्हणजे आधी विषय नीट विस्ताराने मान्डावा लागतो (प्रभावी प्रस्तावना)
....आणि शेवट , वाचकाना धक्कादायक (....हा धक्का सुखदही असो शकतो!!.... ) अशा अन्ताला नेवून ठेवेल असा(प्रभावी समारोप ) करायचा असतो

आपण मात्र एकच /दोनच कडवी रचून थाम्बता तेही वाचकाला हे नक्की काय ते समजायच्या आतच !
म्हणून आपली कविता अजून जरा मोठी हवी

असो
पु ले शु !!
____________

अवान्तरः

मज पिसारे का मिळाले, कापलेले मोर जेव्हा,
माझिया उरात तेव्हा, एकटी लांडोर होती.>>>>सुन्दर !!

यावरून मला माझ्या गझलेतला("शब्दरंध्री पिसारा") एक शेर आठवला...........

फुलेना मुळी शब्दरंध्री पिसारा जणू आतला मोर की जायबंदी
मला एक दे बोलणारी गझल अन् सखे फेड ती तेढ माझ्या पिसांची

.......................पुनःप्रत्ययाबद्दल धन्यवाद !!