अंधार फार आहे संध्या सांज Sandhya कविता

एक देह

Submitted by निलेश बामणे on 7 July, 2012 - 01:22

एक देह

आज जाळला एक देह आठवणीतला
त्याच्यासह घालविलेल्या प्रेमळ क्षणासह

घेऊन काहीही न जाता देऊन बरच गेला
हृदयातील आणखी एका पोकळीसह

त्याचा हळवा प्रेमळ स्वभाव आठवणीतला
जळला आज त्याच्या निर्मळ चेहऱ्यासह

माझ मन अचानक अशांत करून गेला
विचारून प्रश्न अनेक जीवनातील क्षणभंगुरतेसह

तो या जगातून गेल्याचा निरोप मिळाला
भरून आले मन डोळ्यातील अश्रूंसह

कवी - निलेश बामणे

गुलमोहर: 

अंधार फार आहे...........

Submitted by सांजसंध्या on 4 September, 2010 - 09:57

अंधार फार आहे...........
( कविता )

तांडा दिसेल का हो, अंधार फार आहे
मज खूण ही मिळेना, अज्ञान ठार आहे

येऊ कशी कळेना, ही घालमेल चाले
तळपायी रूतलेल्या, काट्यास धार आहे..

नाही असा करावा, भक्तास हा दुरावा
नाही मला बुलावा, त्याचीच हार आहे..

हा मार्ग एकटीचा, साथीस कोणी नाही
डोळ्यांस आठवांचे, आसू उधार आहे..

हे दान जीवनाचे, हासून झेललेले
बोलावलेस अंती , तांडा तयार आहे..

संध्या
०४ सप्टेंबर २०१०१
(पहाटे ३:१()

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अंधार फार आहे संध्या सांज Sandhya कविता