Submitted by मोहन वैद्य on 8 July, 2012 - 07:37
आकाशातील झारीमधुनी
जल बरसे झरझर फिरुनी
लपंडाव अंधार उजेडाचा
सूर्यकिरण अन नभपटलांचा
मंद समीराच्या झूल्यावरती
हिरवे पर्णपाचू मोदे डुलती
रवितेजा पैजू पाहे लखलखती चंचला
साहे ना तेज त्यापरी बघु इंद्रधनुला
ओलेतीचे सौंदर्य बघुनी वसुंधरेचे
तृप्त मनी साफल्य झाले द्रूष्टीचे
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे वर्षासूक्त.
छान आहे वर्षासूक्त.
धन्यवाद विभाग्रज
धन्यवाद विभाग्रज
रवितेजा पैजू पाहे लखलखती
रवितेजा पैजू पाहे लखलखती चंचला
विक्रान्त प्रभाकर, प्रतिसादा
विक्रान्त प्रभाकर,
प्रतिसादा बद्धल आभार