कविता

माझे मन.

Submitted by kishor0705 on 15 January, 2008 - 04:15

ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......!!

मनात्ल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरच का कधीतरी माझी होशिल.....!!

ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......

गुलमोहर: 

मळभ

Submitted by coolKetan on 14 January, 2008 - 01:04

मळभ

मळभ असतंच प्रत्येकाच्या मनात
थोडंसं गढूळ,उगाच आणि कधी निपचीत
काल माझ्या मनात होतं आज डोक्यातही आहे

समीकरणे अनियमीत असतात ती त्यासाठीच
दोन बिंदूमध्ये माझी रेष सरळ नसतेच
मग कुणीही कितीही प्रमेये मांडलीत तरीही

गुलमोहर: 

मी राधिका...

Submitted by सत्यजित on 10 January, 2008 - 08:39

ती...
गुपित मनाचे
कुपित मनाच्या
मी लाजेने जपले
ती साक्ष मनाची
अप्रोक्ष मनाच्या
कुणी कसे ओळाखले?

तो..

जरी आणुन आव
डोळ्यात भाव
तुझ्या कधी ना लपले
हे बंध कशाचे?
का डोळ्यात कुणाच्या
दिसे स्वप्न आपुले

तू भासवले ना
मला कधी जे

गुलमोहर: 

चूक..

Submitted by देवा on 7 January, 2008 - 02:44

एकदा चुकलो होतो रस्ता
चालता चालता नेहमीचाच...

चल म्हणाल्या, "तुला रस्ता दाखवतो"
माझ्याच काही भरकटलेल्या ओळी
"आम्ही फिरलोत या खाच खळग्यातून
तुच भरलीयेस आमची अनुभवाची झोळी"
"धन्यवाद" म्हणालो मी, म्हटलं
"आता तरी मला माफ करा"

गुलमोहर: 

मैत्र जीवांचे

Submitted by arun_lele on 6 January, 2008 - 07:00

मैत्रीच हे अतूट नात
कधी केवळ नुस्त बघून जाणवत
अन चिमणीच्या घासातून पोटात शिरत
कधी ओवीतून पाझरत
कधी शिवीतून बरसत
कधी गुध्द्यात पण सामावत
कधी हातात हात घेऊन खुणावत
कधी शहाण्यांना खुळावत
कधी मनातल्या मनात उमगत

गुलमोहर: 

दंवबिंदूंचे झाले ओझे....

Submitted by arun_lele on 6 January, 2008 - 06:24

बीज एकले खाली जमिनी
ग्रीष्म ताप तो सहन करूनी
सृजन कळा सोसे ही अवनी
दिवस संपती रात्री सरोनी
दीर्घ प्रतिक्षा अशी संपुनी
गर्जत घन ते येता दुरूनी

कुशीत दडले सान सोनुले
काळ्या माती मधे झोपले
हळूच जागे करी तुषार

गुलमोहर: 

नगरसेवकाचा धावा

Submitted by arun_lele on 6 January, 2008 - 05:07

करावया प्रश्न्नाची उकल
त्यासाठी जे अटळ
उतरुनी करु रस्त्यावर || सत्वरी .

प्रश्ण जर सुटता घरी बैसोनी
काय त्याचा उपेग आम्हा कारणी
कैसी मग प्रतिष्टा मिळे || पुढार्‍यासी .

लाऊ ब्यानर प्रत्येक चौकी
द्रुष्टीस पडो सर्वासी

गुलमोहर: 

दार

Submitted by mayurlankeshwar on 3 January, 2008 - 23:29

नाही वाटंत असं आजकाल की
घटनांच्या काळ्यापांढर्‍या कागदावर
उमटवून द्यायलाच हवेत शब्दांचे
शतरंगी शिक्के...
'आहे हे असं आहे' असंच मानून चालायचं
तर मग बसतीलच कसे
अपेक्षाभंगाचे अनपेक्षित धक्के?

गुलमोहर: 

क्षण

Submitted by shuma on 3 January, 2008 - 20:15

सारे क्षण अगदी
आतवर भिजलेले
आयुष्याच्या झरोक्यातून
कवडशांत सजलेले
वाट सरली किती जरी
सुगंध आजही ताजा
न चुकता बहरतोच की
मोगरा तुझा माझा
सारे क्षण कसे अगदी
आतवर भिजलेले
वाटा अपुल्या वेगळ्या तरी
संदर्भ इथेच थिजलेले

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता