चूक..

Submitted by देवा on 7 January, 2008 - 02:44

एकदा चुकलो होतो रस्ता
चालता चालता नेहमीचाच...

चल म्हणाल्या, "तुला रस्ता दाखवतो"
माझ्याच काही भरकटलेल्या ओळी
"आम्ही फिरलोत या खाच खळग्यातून
तुच भरलीयेस आमची अनुभवाची झोळी"
"धन्यवाद" म्हणालो मी, म्हटलं
"आता तरी मला माफ करा"
"लिहिता लिहिता राहिलेत बरेचसे डाग
शक्य असेल तर त्यांनाही जरा साफ करा"
समजूतदार माझ्या ओळी, म्हणाल्या
"तुझं आमच्याशी कुठे वैर होतं,
आमची खंत इतकीच की,
तुझं लेखणीवर नाही, कागदावर प्रेम होतं"

गुलमोहर: 

माझी एक ओळ तुझ्या ओळीशी जुळते

......
...मित्रा मला माफ कर
मनातली धुळ साफ कर...
पुन्हा एकदा भेटु या..
झिम्मड पावसात भिजु या....
...........
...

देवदत्त,
खूप आवडली कविता...

एखादी अशी नाही, सगळ्याच ओळी आवडल्या...

लिहीत रहा...
शुभेच्छा...

मजेशीर वाटली कविता.
''संवाद ' छान जमलाय.

देवा, सुंदर. कल्पना आणि मांडणी दोन्ही आवडली.
कविता आवडली!

धन्यवाद मंडळी..:)
चिन्नु, मजेशीर वाटली कविता? चुकलं बहुतेक माझं काहितरी मग..:(

नाही नाही. मला म्हणायच होतं शैली गमतीदार वाटली. ओळी बोलु शकल्या आपल्याशी तर; हा विचार मजेशीर वाटला.
तुझं कै चुकलं नै! Happy

कविता छान असवी, तुझ्या विडंबनाची चव उतरली कि पुन्हा वाचेन.

त्याच काय आहे लवणीचा ठसका चाखुन, भाव गीताची चव कळेनाशी झालिया... जरा दम धरा पाटील.

देवदत्त,
बर्‍याच दिवसानी कवितेकडे वळले. छानच लिहिलियस कविता!

मायबोलिच्या मुखपृष्ठावर आताच वैभव जोशींचे नाव वाचले मी ष्टार माझा मधे ते विजेते ठरलेते, तेही पहिले. तो कार्यक्रम मी भारतात असताना पाहिला त्यावेळी झाले असे की मी मधल्या खोलीत होतो आणि डोह ह्या त्यांच्या कवितेचे शब्द माझ्या कानी पडले. ती कविता माझ्या स्मरणात होती म्हणून मी लगबगीने दिवाणखान्यात आलो तर साक्षात वैभव जोशी कविता म्हणून दाखवित होते. आंबा कलरचा कुर्ता आणि जीन्न्स असा त्यांचा पेहराव होता. सर्वाच कविता छान होत्या त्या कार्यक्रमातील. असो.. वैभव अभिनंदन!!!!!

मस्तच देवा.
खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला थोडासा तो सार्थकी लागला यावेळी इकडे चक्कर टाकून.