मळभ

Submitted by coolKetan on 14 January, 2008 - 01:04

मळभ

मळभ असतंच प्रत्येकाच्या मनात
थोडंसं गढूळ,उगाच आणि कधी निपचीत
काल माझ्या मनात होतं आज डोक्यातही आहे

समीकरणे अनियमीत असतात ती त्यासाठीच
दोन बिंदूमध्ये माझी रेष सरळ नसतेच
मग कुणीही कितीही प्रमेये मांडलीत तरीही

मला ओढ नको साक्षात्कार हवाय
मला खोड नको साधा विचार हवाय
कारण हवंय मला मीमांसा नको
शब्दांना अर्थ वारंवार हवाय

कुठवर चालावे असेच सव्यंग
मुळात काही असूच नये अव्यक्त
चालावेच म्हणतो जरा तिथपर्यंत
तेव्हा कदाचित माझे मलाच सांगून झाले असेल
-
केतन

गुलमोहर: