कविता

आशा

Submitted by ShantanuG on 11 February, 2008 - 04:20

  1. बघ लोकांना किती महत्त्वकांक्षा त्यांच्या .
  2. मग तुच का रे असा ?
  3. का रे जगाला कंटाळला ?
  4. नको सोडूस आशा माणसा , नको सोडूस आशा .
  5. बघ या लहान चिमणीच्या पिलांना,
  6. आकाशी झेप घेण्याचा ध्यास त्यांचा .

गुलमोहर: 

एकटी

Submitted by kalpana_053 on 10 February, 2008 - 20:44

अत्यन्त गर्दीच्या रस्त्यात
असते कधी मी एकटी
मनात असता
आनन्दी पावसाच्या धारा
मलाच नसते जागा
माझ्या आभाळा एव्हड्या
मनामध्येही.....
कल्पना धर्माधिकारी

गुलमोहर: 

आरसा

Submitted by परागकण on 10 February, 2008 - 15:24

घरातली ही खोली, माझी
मीच निवडलेली
जराशी आडबाजूची
बरीचशी अडगळीची
श्वास खोलावणार्या अंधाराची ...

डोकवायचंच असेल आत तर
ढकलावा लागेल तुम्हालाच दरवाजा स्वतःच्या जोखमीवर.
एक हलकीशीच, पण निश्चयी फुंकरही पुरेल

गुलमोहर: 

आभास सुख-दुखाचा......

Submitted by kalpana_053 on 9 February, 2008 - 19:56

माफ कर दुखा मला
ठेवले तुला हदयातच....
येऊ न दिले कधी ओठावरी
कारण दुख असते एकट्याचे
जसे रडके मूल फक्त आईचे....
पण तुझ्यामुळेच कळली
सुखाची किमत...
पण सुखही असते अपुलेच फक्त...
नयनाच दिसते कधी कधी कुणाच्या

गुलमोहर: 

असे जिवन जगल्यापेक्षा

Submitted by anshu_borde on 8 February, 2008 - 09:39

असे जिवन जगल्यापेक्षा मेलेले बरे
भिती वाटते मरनाची म्हणुन पिलेले बरे
म्हणुन म्हनतो दोस्तानो माझि तिरडी तुम्हिच सजवाल
त्यावर वाहयची फुले आदी दारुत भीजवाल
माझ्या मॉतीला सारे शुद्दीत असतिल

गुलमोहर: 

माझी मुंबई... एक जंगल

Submitted by सत्यजित on 8 February, 2008 - 08:20

नजर जाईल तोवर
पसरलेल जंगल
विटा दगडांच्या समाधीत
विसरलेल जंगल
हिंस्र श्वापदांना मुक्याने
झेलणार जंगल
काळाजावर आघात
पेलाणार जंगल
भजेल त्याला नित्य
पावणार जंगल
धगधगत्या रुळांवर
धावणार जंगल

गुलमोहर: 

'हे' आणि 'ते'

Submitted by मीन्वा on 8 February, 2008 - 03:44

'त्यां'नी मशिदीशेजारी घरं बांधली
आणि मंदिराशेजारी यांनी
आपापल्या परमेश्वराच्या रक्षणाची
जबाबदारी, पेलू लागले दोघेही
मग एके दिवशी
मंदिर नव्हतं...
मशिद नव्हती...
नव्हते दोघांचेही काही भाईबांधव
पण..
दुसर्‍या दिवशी पुन्हा,

गुलमोहर: 

एक गाव.....

Submitted by पल्ली on 6 February, 2008 - 05:47

काही दिवसांपुर्वी
एक गाव बातम्यातुन पाहिलं...
घाटावरचं सारं सारं
पाण्यामधुन वाहिलं...
कुणाची दुधाची बाटली
कुणाचं तांब्याचं पातेलं
झाडावर लटकताना दिसलं
तिचं पातळ फाटलेलं....
सगळ्याची भाषणं झाली
विमानातुन त्यानी भेट दिली

गुलमोहर: 

ऍब्स्ट्रॅक्ट

Submitted by पल्ली on 4 February, 2008 - 06:43

रिकामं रिकामं
एकटेपण भरुन जातं..
जेव्हा तुझ्या आठवणींचं कोडाळं होतं...
मग मी अपुरी रहात नाही....
सगळ्या सुंदर क्षणांची माळ लेवुन
मी श्रीमंत होते.
माझ्या अंगणात मी उभी
सुर्याचं तेज पांघरुन.
कुंपणाबाहेर दूर उभी दिसते

गुलमोहर: 

तुळस

Submitted by पल्ली on 4 February, 2008 - 06:36

कुठल्याशा एका डब्यात
मुठ्भर काळ्या मातीत
तिनं छोटंसं रोपटं लावलं
तुळशीचं.
आठवणीनं पाणी घालुन
रुजवलं...जोपासलं..
कधी गंधाचं बोट
कधी उदबत्तीचा गंध...
तिनं तुळस सजवली,
श्री क्रुष्णा सोबत उजवली...
आताशा

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता