माझा बाप अजून बच्चा आहे
आतुन थोडा कच्चा आहे
व्यवहार काही कळत नाही
पण मनाचा सच्चा आहे
सांगतात सगळे, भरपूर कमव
आयुष्यात जेवढं जमेल तेवढं जमव
स्वतांचं भलं आणि स्वता:च नाव
सगळाच, दिडक्यांचा हिशेब आहे
ह्याचं म्हणणं वेगळच, सांगतो,
जोड नाती, माणसं जमव,
मुला - नातवंडांना सुखानं रमव
मला खरच तेवढच हवं आहे
शिकायचं तर शिक, हवं तर
खेळायचं तर खेळ जन्मभर
काय करशील ते कर मनोभावे
असा जगावेगळा सल्ला आहे
बघ हे तारे, तो ध्रुव आणि व्याध
पावसात भिजलेले हिरवे पहाड
घे श्वासात भरुन न्हालेल्या बाळाचा गंध
ह्यातच जगण्याची सगळी मजा आहे
वाटून घे तिळ, सात जणात सारखा
दे हात त्याला, जो सुखाला पारखा
नाही आनंद, कुणाला काही देण्यासारखा
घे शिकुन, खरं सुख कशात आहे,
म्हणतो, झालास नापास? का? विचार स्वता:ला
पुढच सारं वर्ष, वाहा, अभ्यासाला
मनात आणशील ते करशील हिमतीने,
एवढी ताकद नक्की तुझ्यात आहे
वाटतं आपणही रहावं कच्चं, त्याच्या सारखं
आख्ख आयुष्य जगावं निरागस मुलासारखं,
ताज्या फ़ुलासारखा कसा आनंदात आहे
भोवती मायेचा गोतावळा, मनात समाधान आहे
स्वता:चं भलं कधीच पाहिलं नाही
आमच्यासाठीच अजुन खपतो आहे
कच्चा की बच्चा, त्याला सुखात ठेवावे
बस, एवढीच मनात आस आहे
छान आहे... हेच निरागस विचार
छान आहे... हेच निरागस विचार कायम असोत. जगाच्या रहाट-गाडग्यात विसरायला होतात. कविता आवडली
मस्तच. खूप आवडली कविता.
मस्तच. खूप आवडली कविता.
कच्चा की बच्चा, त्याला सुखात
कच्चा की बच्चा, त्याला सुखात ठेवावे
बस, एवढीच मनात आस आहे>>>>>>>म्हातारपणी त्याला वृद्धाश्रमात नका टाकू रे!
कविता सुंदर्,त्यामागची भावनाही सुंदर.
(No subject)
सुंदर.......
सुंदर.......
धन्यवाद!
धन्यवाद!
चांगली आह॓. आवडली
चांगली आह॓. आवडली
छान आहे
छान आहे
कच्चा की बच्चा, त्याला सुखात
कच्चा की बच्चा, त्याला सुखात ठेवावे
बस, एवढीच मनात आस आहे>>>>>>>म्हातारपणी त्याला वृद्धाश्रमात नका टाकू रे!
हा बाप थोडासा, मीच आहे.
वडीलांनी भरभरुन प्रेम दिलं, स्थावर जंगम काही ठेवलं नाही, आणि ह्यात त्यांच काही चुकलं असं मला तरी वाटत नाही.
दुसर्याचा विचार करणं, आधाशीपणे न ओरबाडता समाधानानं रहाण, ह्याला सतत स्पर्धा करणारी पुढची पिढी बावळट पणा मानत असेल का?
हा थोडा गोधल मनातला, ही कविता!
(No subject)