देवाच्या दारात

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 July, 2012 - 05:09

देवाच्या दारात
गट होतात
लोक भांडतात
निष्ठेने किती

जरी असे एक
आराध्य दैवत
गाठणे जीवनी
एकच ध्येय

भक्तात श्रेष्टत्व
उच्य नीचत्व
अहंता वाढवत
घड़े का साधन

इथे ही जर
द्वेष मत्सर
काय संसार
मग वाईट

विक्रांत

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

इथे ही जर
द्वेष मत्सर
काय संसार
मग वाईट>>>>

मग संसाराचे श्लोक लिहावे लागतील.
आपण छान लिहिता,आपला कंपू तयार करा.