माहीसाठी उमटलेली कळ

Submitted by pradyumnasantu on 25 June, 2012 - 23:31

जा गं जा, जाऊन ये, शहाणी माझी बाई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
वाढदिवस ना आज तुझा? मोठी तू होणार
बसून बाबांच्या स्कूटरवर शाळेला जाणार
बर्थडेचे काढू फोटो चल चल कर बरं घाई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
*
पाहत होतो वाटच मी, बाहेर कधी ती पडते
हात पिरगाळुन तिचा मज नोट कधी हाती येते
पाचच वर्षांची मुलगी ती काय विरोध करेल
हूं की चूं जर करेल कार्टी माझ्या हाती मरेल
आईची तू पाळच आज्ञा करू नको कुचराई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
*
कृपा ईश्वराची चोराचा क्रूर इरादा फसला
त्याला ओळखणारा पोलिस रस्त्यावरती दिसला
नको तावडीत त्याच्या म्हणुनी चोर सटकुनी गेला
पण....
क्रूर बलात्कारी मी होतो तिथेच तिज धरण्याला
बरे जाहले चिमुरडी ती सुटली चोराच्या हातुन
बलात्कारी मी आहे ना तिज मारून देईन टाकुन
वेळ किती लागेल मोडण्या मान पाच वर्षांची
हाच आडाखा बांधत जातो खिशात ठेऊन बरची
दुकानाजवळ वळेल जशी ती घेईन ओढुन तिजला
सोडविण्या तिज कोण येतसे, ईश्वर? तो तर निजला
पहात राहतील वाट घरी ते वडील आणखी आई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
*
दुकानाकडुन वळता वळता हात पकडला याने
पण परमेश्वर निजला नव्हता दिधला झटका त्याने
छातीमध्ये कळ येऊन तो क्रूर तिथे तडफडला
धरणा-याहून सावरणारा हातच भारी पडला
आनंदाने हसत बागडत घरी निघाली माही
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
*
हॆपी बर्थडे म्हणण्यासाठी आम्ही जवळच होतो
सरकारी अधिकारी आम्ही आम्हास कोण अडवतो
मलीदा खाऊन काँट्रॅक्टरला दिले सोडुनी सैल
तोंड आमचे झाकुन ठेवू खुलीच बोअरवेल
चोर, बलात्का-याच्या हातुन सुटून गेली माही
तावडीत भुईवरच्या देवांच्या अलगद पडून राही
ऐंशी नव्वद तासांनंतर कशि तू जगशिल बाई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई?
***

गुलमोहर: 

सर, कोणा एकाला आवडावी म्हणून कविता कधीच लिहू नये असे माझे मत आहे... कविता हा माझ्यासाठी तरी स्वानंद आहे.... ती कोणा 'शाम'ला पटो ना पटो काय फरक पडतो त्याने....?
म्हणून माझं विधान फार गांभिर्याने घेऊ नये ही विनंती... पु.ले.शु Happy

काव्यकथानक छान

(बहुधा मयेकर सांगू शकतील - पूर्वी म्हणे कोणी चंद्रशेखर होते ते अशा कविता - कथाकाव्य - लिहायचे. त्यांचे आडनाव नाही माहीत).

(मीही अशा रचना काही काळ रचल्या होत्या.)

शामरावांशीही सहमत आहे

असे अजुन किति बलि गेल्यावर तिथलि जनता जागि होनार? पानि लागले नाहि तर लगेच ख् ड्डा बुजवनार?काव्यातिल कण् व जाणवलि.