Submitted by सांजसंध्या on 27 June, 2012 - 02:53
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू
आईस रडवण्याचे, आभार घेतले तू
वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे
मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू
मातीत वेदना ही, का उगवते अजूनी
झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू
अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे
तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू
रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू
स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू
कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू
- संध्या
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच,
मस्तच, सुंदर्...............आवडली........
कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू
हे तर १ नंबर........
योगुली थँक्स रात्रीस सांगते
योगुली
थँक्स
रात्रीस सांगते मी.... ही द्विपदी आता अॅड केली.
छानच जमली !
छानच जमली !
आवडली
आवडली
सुंदर
सुंदर
मस्त
मस्त
सध्या प्रकृती साथ देत नाही.
सध्या प्रकृती साथ देत नाही. पूर्वी अशा कवितांवर पानेच्या पाने लिहायचो.
फिरून येतो जरा.
मफिलीतले गंधारच का घेतले यावर विचार करत करत चालावे म्हणतो
वृत्तासाठी तर नसणारच, मग निषाद, पंचम यांनी घोडे मारले की काय?
कळावे
गंभीर समीक्षक
दवा... घ्या नक्की
दवा... घ्या नक्की
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज
अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे
तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू >>>>:)
छानच
छानच
आवडली
आवडली
व्वा! मस्त मस्त! एकुणएक शेर
व्वा! मस्त मस्त!
एकुणएक शेर मस्त!
मस्तच.
मस्तच.
रोमँटिक
रोमँटिक वर्जन...
==============
अंधारल्या मनांचे, आजार घेतले तू
प्रीतीस टाळण्याचे, आभार घेतले तू
आधार आपल्याला, दोघेच काल होतो
मदिरेत झिंगले जे, आधार घेतले तू
छातीत वेदना ही, का उमटते अजूनी
काळीज जाळणारे, अवतार घेतले तू
आभाळ काजळाने, डोळ्यांत दाटलेले
तुजला प्रकाश आहे, उपकार घेतले तू
रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू
स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू
कोमल जराजराशी, दिधली तुला स्वराली
बदनाम गायकीचे, झंकार घेतले तू
- K
सर्वांचे आभार .. मनापासून
सर्वांचे आभार .. मनापासून

आर्यातै
काही काही ओळी आवडल्या.
काही काही ओळी आवडल्या.
बरी वटली बरे झाले गझल केली
बरी वटली
बरे झाले गझल केली नाहीत नाहीतर हस्य-प्रतिसादान्चा धो धो पाऊस पडला असता
कावाफी , खयाल मस्त आहेत ,
रदीफेमुळे काफिया व खयाल यान्ची मजा वाढायला हवी तसे नाही जाणवले क्षमस्व .
शेर म्हणावेत इतका कस नाही जाणवला
कविता म्हणून छान आहे आशय-विषय आवडला
वैवकु धन्यवाद. ही कविता आहे
वैवकु
धन्यवाद. ही कविता आहे
ही कविता आहे>>>>>>>>>> होय
ही कविता आहे>>>>>>>>>>
होय सन्ध्याजी हे गृहित धरूनच मी वरील प्रतिसाद दिला आहे
या रचनेचे गझलेच्या आकृतिबन्धाशी बरेच साधर्म्य असल्याने इतराना ती गझल आहे की काय असे वाटू नये म्हणून मी काही मुद्दे मान्डले होते
धन्यवाद
सासं, आवडली कविता. रात्रीस
सासं, आवडली कविता.
रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू
स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू >>>> फारच सुंदर !
मनिमाऊ थँक्स वैवकु बरेचदा
मनिमाऊ थँक्स
वैवकु
बरेचदा गद्य शेरांपेक्षा आणि तुटक तुटक मिस-यांपेक्षा ब-याचदा कविताच बरी असं वाटतं. मन लावून वाचली कि आशय लक्षात येईल. आईला वृद्धाश्रमात सोडून गेलेल्या एक कर्तबगार मुलाची त्या आईने काढलेली आठवण आहे ही... थोडी तरी हाय लागतेच
गद्य शेरांपेक्षा आणि तुटक
गद्य शेरांपेक्षा आणि तुटक तुटक मिस-यांपेक्षा ब-याचदा कविताच बरी. >>>>>>>>>>> मला आपले म्हणणे थोडे थोडे पटते आहे
कविता बरीच असते....... मलाही असेच वाटते !!
गझलही चान्गलीच असते ..असे मला वाटते
असो
एक सान्गायचे राहून गेले ; की मला ही आपली कविता पाहताक्षणीच आवडली आणि कळालीही होती
माझ्यावर उगाच रागावू नये ही काकुळतीची विनन्ती
धन्यवाद !!
--^--
--^--
माझ्यावर उगाच रागावू नये ही
माझ्यावर उगाच रागावू नये ही काकुळतीची विनन्ती
ए गपै नौटंकी
कोमल सुरावटींची, दिधली तुला
कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू.
व्वा!!!!!!!!! फारच छान.
ए गपै नौटंकी >>>>>>>>>> (
ए गपै नौटंकी >>>>>>>>>>:(

(:G
:खोखो:)
सां.सं मस्त आहे ग ही कविता,
सां.सं मस्त आहे ग ही कविता, मी वाचलीच नव्हती.
आभार सर्वांचे
आभार सर्वांचे
Pages