ही कविता माझ्या आत्याची आहे. साधारण सत्तरीतली माझी आत्या छान लिहिते, ती घरी गुणगुणत असतांना मी रेकॉर्ड केली.. अमरावतीतील खेड्यातल्या बोलीभाषेत आहे...
जाशी रेकॉर्ड केली तशी टाकतोय, सांभाळून घ्या..
टुकू टुकू पाय..
कलयुगाची कशी गती आली,
बुढा बुढी म्हने आपली पंचाईत झाली,
बुढा म्हने बुढीले मुकाट्यान ऱ्हाय,
अव टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय,नाई तं तुया जीवाची होईन वाय वाय.
बुढी म्हने पोरासाठी नवस केले किती,
काय सांगू बाई माया जीवाची गती,
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय..
बुढी उठली पायटी हाती घेते फडा,
बुढा म्हने ची बिन इच्या जिवाले मोठा वळा,
पायटीच टाकते शेणाचा सडा,
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय..
सून उठली पायटी कर कर करे,
सार्या घरात बाई बिना आंघोइची फिरे
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय..
बुढी उठली पायटी बद्द्कन पडे,
बुढा म्हने चीबिन इन रात्री खाल्ले वडे,
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय..
बुढा म्हने मले बाबू घुर घुर पायते,
बुढी म्हने जाऊ द्यान त्याले काय कयते,
बायकोच्या पुढ्यात तं गोंडाच घोयते,
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय..
नये पनात बुढा बाई सट सट करे,
अन हर दुसर्या दिवशी मले काडीनच मारे,
आता कसा बसते वं माकडावानी,
कोण देते याले गिलास भर पानी,
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय..
पोरग म्हने माय वं तू अशी कशी झाली,
मी व्हाच्या आधी काऊन नाई मेली,
तू जाय चुल्यात, बुढा जाईन उल्यात,
मले बसुदे आता व्हारांड्यातल्या झुल्यात
टुकू टुकू पाय आता टुकू टुकू पाय, नाई तं तुया जीवाची होईन वाय वाय...
निर्मला पखान
मस्त कविता आहे रे....! मस्त
मस्त कविता आहे रे....! मस्त लय आहे...
तुझ्या आत्याला मानाचा मुजरा यार....
अवांतर : पायटी म्हणजे काय?
धन्यवाद विशाल... पायटी =
धन्यवाद विशाल...
पायटी = पहाटे