Submitted by नादखुळा on 29 March, 2011 - 00:30
माझं तुझ्यावर किती प्रेम आहे
माहित आहे तुला?
हा तुझा नेहमीचाच प्रश्न आहे
कि रेटा ?
हे तुला कळलंच नाहीये बहुदा..
तुला आठवत असेल कदाचित
कि प्रेमात पडल्यापासून
मला निभावणं जमलंच नाही
आणि जमणारही नाही..
पण तु मात्र,
काही गोष्टी सहजासहजी टाळून,
हवं तेवढं देत गेला आणि
मिळवतही गेलास..
माझ्या नशिबी असं
घुंगराचं जगणं आलंय,
त्याचं मला काहीच वाटत नाही..
पण..
मैफिल सजवायला
घुंगरू पुरेसे नसतात रे !
'बेताल' घुंगरांचा
हा नाद सोड आणि सोडव रे आता,
नाहितर उगाच 'सुन्या मैफिलित माझ्या'चे
गाणे ओठांवर येता येता,
पापण्यांना हळूवार मिटणेही
अवघड व्हायचे !
- न्नादखुळा
गुलमोहर:
शेअर करा
एकदम हटके .मस्त .
एकदम हटके .मस्त .
मस्त -एकदम माझ्या नशिबी
मस्त -एकदम
माझ्या नशिबी असं
घुंगराचं जगणं आलंय,
त्याचं मला काहीच वाटत नाही..
पण..
मैफिल सजवायला
घुंगरू पुरेसे नसतात रे !
प्रकाश, छायाताई आपले धन्यवाद
प्रकाश, छायाताई आपले धन्यवाद
मित्रा, कवितेचा ताल चुकलाय.
मित्रा, कवितेचा ताल चुकलाय. सुरुवात एक आहे आणि शेवट दुसरीकडेच.
कौत्या मलाही थोडं तसंच
कौत्या मलाही थोडं तसंच वाटलं...