आगळा संवाद

Submitted by bnlele on 1 June, 2011 - 23:34

आगळा संवाद

गोरा कुंभार पायांनी मळतो माती,
गरगर फ़िरते चाक घड्यांची तिथे रास.
जगदीशाच्या नांमाचा करून उद्‌घोष,
कांतितेज अन्‌ दरवळतो संतोष.
तन्मयता ती दिसे वेगळी प्रत्येकाला,
कुणी म्हणे शरण खरा परमेशाला-
कलावंत तो सेवेत कलेच्या बुडला !
घडे मोजता दिसे वेगळी पत्नीला !
पत्नी केवळ कुरतडते नखाने नाती,
मनीं पुसते -"कां केली मम आयुष्याची माती ?
सर्व घड्यांची रिक्त ठेवुनी पोटे- खंत कशी ना वाटे ?"
घडता अग्निदिव्य मांजर-पिल्लांचे वदला गोरा--
"उमगे सार्थक हेच जीवनाचे.
घडे रिकामे नसते तर नसती जगली ती
दैव नव्हे किमया ही कष्टांची !"
संपूच नये आसक्ति जीवनाची.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान