कविता

ते मात्र तुलाच माहित!

Submitted by बागेश्री on 6 June, 2011 - 02:21

तुझं दिलखुलास हसणं,
अन् फुलांच प्रसन्न उमलणं,
ह्यातलं साम्य मलाच माहित.....

तुझ्या भावनांची नजाकत अन्
'पारिजातक'.....

गंधभारला 'चाफा' अन्
तुझ्या शब्दांची टप-टप....

तुझं बहरलेलं व्यक्तिमत्त्व अन्
उमलून असलेला 'जास्वंद'....

तुझं अवती-भोवती असणं अन्
'सदाफूलीनं' फुलणं....

'निल-कमळांच' अवचित एकदा उमलणं, अन्
तुझ्या-माझ्या भेटीच निमित्त....

ह्या सगळ्यातलं साम्य, फक्त 'मलाच' माहित....!!

भरगच्च नि दणकट वड; त्याच्या बुंध्याशी
वाढणारी, बेफिकीर कोवळी पालवी,
अन् तुझी 'मऊ-साउली',
ह्यांच्यातलं नातं रे सख्या,
केवळ मलाच माहित.....!!

पण;
हे शब्द मांडतांना होणारी

गुलमोहर: 

...जीवनाच्या कणाकणाचा मीच साक्षी !

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:35

कितीक आली आणि गेली
पाखरे गोंदून नक्षी ,
जीवनाच्या आकाशाचा
एक माझा मीच साक्षी !

कितीक वाहिले वादळवारे,
कितीक तुटूनी पडले तारे,
आकाशही कोसळले सारे...
वेदनेच्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

सुखामध्ये आतुर झालो,
दुखा:मध्ये कठोर झालो,
भावनेला फितूर झालो…?
भरकटलेल्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

हारलो ना,जिंकलोही,
बे-ईमान विकलो नाही,
कर्तव्याला मुकलो जरि,
निर्णयाच्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

ग्रीष्मामध्ये वठलो नाही,
शिशिरात गोठलो नाही
वसंतात फुललो न जरि,
फुललेल्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

मला येथली प्रीत न कळली,
जगण्यामधली रित न वळली,
विरले जीवनगीत जरि,

गुलमोहर: 

दिसभर उन्हातान्हात

Submitted by पाषाणभेद on 6 June, 2011 - 00:15

दिसभर उन्हातान्हात

दिसभर उन्हातान्हात; तोड केली जंगलाची
बाभळीचा काटा रुतला; धार काढली रक्ताची

जीव जगवला खावून; कोरडी भाकरी चटणी
तहान भागवाया; आहे ओढ्याचे पाणी

साता महिन्यांची; घरधनीन पोटूशी
तिला कसं आनू संगती? ती तर पोटाने उपाशी

मोळी वाळल्या लाकडांची; जाईल का विकून?
तेल मिठ मिरची आणायाला; पैसं मिळलं का त्यातून?

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०६/२०११

गुलमोहर: 

पाऊस पैंजणांचे गाणे !

Submitted by नादखुळा on 5 June, 2011 - 23:32

चिंब ओल्या थेबांनी सजविले,
गार गार सरींचे हे झुले,
हे पाऊस पैंजणांचे गाणे,
आता मज वेडावूनी गेले..

गर्द हिरवाईचे रान,
थेंब नितळती पान,
स्पर्श शहार्‍याला आता,
बघ येईल उधाण..

नको जाऊस अशी दूर,
सोडून गारव्याची मैफल,
एकरूप तुझ्या माझ्या देहासी,
लागे उमलण्याची चाहूल..

धुंदीतल्या या क्षणांना,
नेहमीच मी पापण्यांखाली घेतो,
सखे,तुझ्याविना कधीतरी,
मी हि एकांत दाटून,
आठवांसोबत ओघळून घेतो..

-- नादखुळा

गुलमोहर: 

निरुत्तर

Submitted by गणेश भुते on 5 June, 2011 - 18:22

मी 'लादेन'ला मारल्याची बातमी वाचत असताना
माझं तीन वर्षाचं पिल्लू
माझ्या पाठीवर रेलत, माझ्या गळ्यात हात घालून, माझ्या गालाला गाल लावत
वर्तमानपत्रातला फोटो बघून मला प्रश्न विचारतं

" बाबा, त्या बिल्डींगला आग का लागलीये ? "

मी : " विमान धडकल्यामुळे "

"विमान का धडकलं ? "

मी : "एका 'बॅड्बॉय' काकांनी धडकवलं बाळा "

"ते काका 'बॅड्बॉय' का होते ?"

मी : "देवबाप्पालाच माहिती बाळा ...."

--- गणेश भुते

गुलमोहर: 

एकाकी मन

Submitted by ananda on 5 June, 2011 - 16:01

आज शब्द सुचेनासे झालेत,
फक्त जाणवतो स्पर्श एकांताचा.
वाटते येते सुट्टी उगाच,
जाणवुन देण्या त्या चार भींतीचा एकांतवास!

एकटं जगण्याचा आहे अट्टहास,
पण आता काळोखाचीही भिति वाटते.
भरुन येतो हुंदका खोल मनात,
जाणवुन देण्या कुणी नाही अश्रु पुसण्यास!

आता रोजची वाटही अनोळखी वाटते,
नाही कुणाची साथ.
साद पडते कानी आपुलकीची दुरुनी,
जाणवुन देण्या हा तर फक्त आभास!

काढाया ते एकाकी क्षण,
घुटमटळत रहायचं कुठेतरी उगाच.
येई कातरवेळ घेवुन संधीप्रकाश,
जाणवुन देण्या तु आहे एकटा असाच!

गुलमोहर: 

वेध..

Submitted by निवडुंग on 5 June, 2011 - 15:10

आजही स्पष्ट आठवतेय,
मनाच्या कोपर्‍यात कायमची कोरलेली,
ती पौर्णिमेची दुधाळ रात.

तुझ्या चहूबाजूला चांदणं सांडलेलं,
अन तुझ्या सख्या चंद्राने,
लख्ख उजळवलेला तुझा सावळा चेहरा.
फक्त माझ्याचसाठी.

तुझ्या प्रेमळ कुशीत पहूडून,
काळ्याभोर डोळ्यांतल्या चांदण्या पाहत,
विचारला होता एक साधाचसा प्रश्न,
तुझ्याच चंद्राच्या साक्षीनं.

खरं सांग,
मला कधीच कधीच विसरणार नाहीस ना?

खळखळून हसलेलीस तू तेव्हा,
अन् वास्तवाच्या दाहकतेचा चटका बसताच,
क्षणात अंतर्मुख झालेलीस.

वेडा आहेस तू म्हणे,
कितीही काही झालं तरी,
मी तुला कध्धी कध्धी विसरणार नाही.

आपल्या वाटा वेगळ्या झाल्या जरी,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

येरे येरे पावसा!

Submitted by -शाम on 5 June, 2011 - 12:53

कोण जाणे त्याला,पाऊस का आवडतो?
थेंब पडू लागले, की दाराआड दडतो

होडी करत नाही, की बांधत नाही किल्ला
सरीत भिजणं सोडा, तो सोडत नाही मला

टक लावून बघत राहतो ऊंच करून टाच
अंगणात जेंव्हा सुरू होतो थेंबांचा नाच

अशात पाऊस थांबला की जोरात ओरडतो
का येत नाही पुन्हा म्हणून रड रडतो

पहिली फिट आली तेंव्हा डॉक्टर बोलला होता
हळूहळू समज येईल जसा होईल मोठा

डॉक्टर कुठे देव असतो म्हणतो तसं व्हायला
दिवस्,महिने,वर्ष गेली गुण नाही आला

कधी वाटतं उद्या नक्की 'बाबा' म्हणेल मला
पुस्तक हवं, गाडी हवी, त्रास देईल चांगला

अजून तरी तसा उद्या आला नाही
रोज नवा प्रश्न्न घेऊन दिवस उभा राही

गुलमोहर: 

चिंब

Submitted by अज्ञात on 5 June, 2011 - 09:05

रानमाळी पावसाळी चिंब ओली पाकळी
झाडपानी निथळणार्‍या चाहुलींच्या थेंबओळी
मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी
रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी

आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी
सावलीच्या पाउली उमले कळी कळि वेगळी
ओघळे मन ओघळांवर श्वास भरती पोकळी
बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी

रम्य निर्मळ स्फटिकधारा जात त्यांची सोवळी
स्पर्श होताक्षण धरेचा अर्घ्यमुद्रा ओवळी
वाहतांना नांदती काठावरी स्वप्नावळी
जीवनी ही सृजनतेची एक मोठी साखळी

...........................अज्ञात

गुलमोहर: 

को़कणसय ... पाऊसमय !!!

Submitted by सत्यजित on 5 June, 2011 - 08:36

माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण

आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी

गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला

आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड

हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा

घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात

नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू

बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता