शेवटी कोल्ह्याला द्राक्षे आंबटच.....
water colour on handmade paper with ball pen rendering...
water colour on handmade paper with ball pen rendering...
माझी कन्या मधुरा,हिने काढलेले,मायक्रोसॉफ्ट पेंटमध्ये काढलेले एक निसर्गचित्र!
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी
ऊन माळते असे की ,जसा गजरा माळते
वाळवणासारखी तू बये उन्हात वाळते
कुणी वाचत का नाही तुझ्या दु:खाची कहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी
ऊन वारा पावसाळा ,किती सोसणार माती
किती स्वभावाची बये तूच सांभाळते नाती
वेड्यासारखी राबते अशी कशी तू शहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी
कधी आटतच नाही तुझ्या वात्सल्याचा झरा
तुला जाणता जाणता होतो देवही बावरा
कधी राधेचा वसंत,कधी मीरेची विराणी