अब्दुल रेहमान मार्ग - मुंबई.

Submitted by पाटील on 7 August, 2011 - 06:58

Picture 139.jpg

गुलमोहर: 

अप्रतिम...चित्रात गर्दी असुनही मोकळेपणा जाणवतोय..
कॅमल चे ट्युब .कलर्स वापरले आहेत कि अजुन कोणते?कोणता पेपर वापरता? बेस साठी वॉश [कलर] दिल होता का ? आधी पेन्सिल स्केच केले होते का?

धन्यवाद .
सुलेखा- रंग कॅमल आणि काही शेड्स winsor newton च्या आहेत. पेपर GVA PRO. पेंसिल स्केच अगदी आवश्यक तेव्हढेच केलय.

पाटील साहेब चित्र फारच सुंदर चितारले आहे Happy

पण्..चित्रातील वातावरणात तफावत आहे...

आभाळ धुरकट किंवा करड्या रंगाचे असयला हवे म्हणजे पावसाळी वातावरण स्पष्ट होईल...असे वाटले.
दुसरे म्हणजे छत्र्यांचा आकार टाळक्यांपेक्षा जरा जास्तच मोठा झाला आहे.....त्यांचा रंगही (स्टाईल) सारखाच....जत्रेत स्टॉलवर (छ्त्र्या) असतात तसा वाटत आहे...त्यामुळे रेहमान स्ट्रीटचा 'फिल' कमी झाल्या सारखा वाटला.

बाकी बेस्ट Happy

GVA PRO-चे पेपर्स म्हणजे काय? याच्या शीट्स मिळतात का? तसेच
winsor newton चेट्युब कलर्स हे याच कं .च्या नांवाने मिळतात का? थोडा बाळबोध प्रश्न आहे?कारण मी फक्त फेवीक्रील व कॅमल च्या अक्रिलिक वर भरपुर काम केले आहे..कॅमल चे ऑईल कलर्स ही वापरले आहेत..आता वॉटर कलर मधे करण्याची इ च्छा आहे..तेव्हा थोडी माहिती द्याल का?

GVA pro - papers ART LOUNGE - ईरॉस सिनेमा च्या बाजुला जो पेट्रोल पंप आहे तीथे किंवा लँड्मार्क स्टोर्स मधे मिळेल पण हा पेपर तीतकासा चांगला नाहिये. Winsor Newton दोन क्वलिटी मधे मिळतात १. विन्सर न्युटन ( प्रोफेशनल ग्रेड) आणि कॉटमन ( सेमी प्रो ) . कॅमलच्या तुलनेत यांची ट्रांस्परंसी खुप चांगली आहे मात्र त्यामुळे महाग हि आहेत.

अजय खूपच छान.. सर्वात मुख्य गोष्ट आवडली ती म्हणजे.. बारकाव्याने टिपलेल्या त्या वीजेच्या तारा... त्यांच्याशिवाय हा परिसर पूर्णच होउ शकत नाही Happy नी सर्वात मागे दिसतेय ते जामा मस्जिद ना ?

मस्त Happy

पेंटिंग आवडले. Happy
चातक म्हणतो त्याप्रमाणे अब्दुल रेहमान स्ट्रीट चा फील आला नाहीये.
एक ही पिवळी टॅक्सी दिसत नाहीये, एकही पाटीवाला, हातगाडीवाला दिसत नाहीये, पाऊस असलं तरी अब्दुल रेहमान स्ट्रीट वर गर्दी असतंच.

Happy

Pages