तुझ्या डोळ्यामध्ये पाणी

रेखाचित्र

Submitted by कमलाकर देसले on 26 June, 2011 - 06:52

Image (12).jpg
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी

ऊन माळते असे की ,जसा गजरा माळते
वाळवणासारखी तू बये उन्हात वाळते
कुणी वाचत का नाही तुझ्या दु:खाची कहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी

ऊन वारा पावसाळा ,किती सोसणार माती
किती स्वभावाची बये तूच सांभाळते नाती
वेड्यासारखी राबते अशी कशी तू शहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी

कधी आटतच नाही तुझ्या वात्सल्याचा झरा
तुला जाणता जाणता होतो देवही बावरा
कधी राधेचा वसंत,कधी मीरेची विराणी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - तुझ्या डोळ्यामध्ये पाणी