उठला दुरावा दोन टोकाच्या मनांचा... (दीर्घ गझल...)
उठला दुरावा दोन टोकाच्या मनांचा
पाऊसही पडला हिशेबी आसवांचा
बोलाविताना हातचा राखून होती
तो बांध फुटला भेटल्यावर काळज्यांचा
होतीस तू इतकी जवळ? कळलेच नाही...
मी घेतला आस्वाद माझ्या भाकऱ्यांचा
उपहास, चेष्टा, वल्गना मी जोजवीतो
आहे तुझा, आहे तसा मी वेदनांचा
चमकून जाते वीज कडकड सांजवेळी
धिक्कार होतो आजही प्रेमी जनांचा
धरणे नको बांधू प्रवाही भावनांवर
सुटलाय केंव्हा प्रश्नही निष्कासितांचा ...?
गोडी कशी देऊ मनाच्या वावरातुन
जळलाय सारा ऊस माझ्या भावनांचा
नाते कसे जुळते पहा विराहातसुद्धा
प्रत्येक अश्रू होत होता पापण्यांचा
नाती नव्याने रंगवा, सजवा कितीही ..