Submitted by सागर कोकणे on 3 July, 2012 - 09:33
उधळून मुक्त दाने द्यावी कधी कधी
हिंडून गाव भिक्षा घ्यावी कधी कधी
बहरात या ऋतूच्या, कोमेजलो असा
वाटे समोर तू ही यावी कधी कधी
वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी
जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी
ते वाहती फुलांचे, निर्माल्य सागरा
त्यानेहि भावसरिता, प्यावी कधी कधी
-काव्य सागर
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
गझलेसमान ती ही व्हावी कधी
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी>>> वा
वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद
वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी>>>
मलाही हाच शेर सर्वाधिक आवडला
इतर ही छानच आहेत
शुभेच्छा!!
छान आहे ... जे सोडती न आशा,
छान आहे ...
जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी
मस्तच..
सर्वांचे आभार...
सर्वांचे आभार...