मराठी गझल

पाखंड

Submitted by रामकुमार on 5 July, 2011 - 09:02

मनाच्याच उर्मीत निर्माण सारे
मनाच्याच धुंदीत बेभान वारे

मनाच्याच गुंत्यात बंदिस्त धागे
मनोनीत देशी मनस्वी विधाने

मनाच्याच विश्वात विश्वास जागे
मनाच्याच ठायी निराशा विहारे

मनाचा पसारा उभे विश्व सारे
रवीतेज रत्ने मनाचे धुमारे

मनापासुनी जोडले मित्र जैसे
मनानेच हे निर्मिले शत्रु त्वा रे!

मनें पुण्य केले, मनी पाप आले
तयाचेनि भोगे जिवा कष्ट झाले

कसा ठाम राहू, कसा एक सांगू?
मनाचे चतूरस्त्र येती इशारे

कसे शब्द गुंफू,कसे सूर छेडू?
मनी आर्त संगीत अस्थीर चाले

स्वये मार्ग रोधी, स्वये दूर सारी
मनाच्याच डोही मनाचे फवारे

मनाची कहाणी लिहू काय काजी?

गुलमोहर: 

माणसे

Submitted by सुहासिनी on 23 June, 2011 - 08:53

का बरे अशी सदा वागतात माणसे
माणसास का अशी जाळतात माणसे

धन नसे ना धान्यही लेखणी न मानही
राहतात पण सुखी भारतात माणसे

नीति तत्व ना इथे ना कृती न कामही
खूप-खूप भाषणे झाडतात माणसे

स्रीच मुक्त जाहली मोकळी सदाच पण
भावना उरी इथे गाडतात माणसे

त्याग करतसे असा भास खास फक्त पण
स्वार्थची सदा इथे साधतात माणसे

ताण आज सारखा का मनात वाढतो
गोड बोल बोलणे टाळतात माणसे

-सुहासिनी सुरेश

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तो पूर पावसाचा -

Submitted by विदेश on 22 June, 2011 - 09:22

तो पूर पावसाचा डोळ्यांत साठलेला
प्रेमात भंगता मी डोळ्यांत दाटलेला |१|

आकाश भार झेले लाखो पतंग उडता
माझा पतंग दिसतो तो खूप फाटलेला |२|

लाभात खूप आता व्यवहार येथ झाले
व्यवहार नेमका का माझाच घाटलेला |३|

माझ्या मनांत घुसले तव वार पापण्यांचे
जखमी कसा ग सांगू आनंद वाटलेला |४|

रस्ते अनेक दिसती ओसाड चालता मी
वाटयास मात्र माझ्या गर्दी झपाटलेला |५|

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वभाव

Submitted by सुहासिनी on 21 June, 2011 - 11:03

टाकुन बोलण्याचा माझा स्वभाव नाही
तू बोल जे हवे ते माझा दबाव नाही

संभाषणात असतो स्वार्थी पणाच हल्ली
स्वार्थाशिवाय आता कुठलाच आव नाही

भोन्दु तसेच ढोन्गी पूजा करून घेती
सच्चेपणास आता कोठेच वाव नाही

लोभामुळेच आता बनलेत चोर सारे
दावाय वानगीला विश्वात साव नाही

होते अनेक ज्याना जगतात मान होता
आदर कराय आता कुठलेच नाव नाही

माणूस़की असाया माणूसपण हवे ना
शोधू कुठे तयाला त्याचाच ठाव नाही

-सुहासिनी सुरेश

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

राख

Submitted by संतोष कसवणकर on 7 May, 2011 - 07:16

राख सार्‍यांची जरी मातीस या मिळणार आहे
गंध थोड्यांचा परी मातीत या उरणार आहे

धीर धर अन कास सत्याची कधी सोडू नको तू
शेवटी ते पारडे सत्याकडे झुकणार आहे

स्वार्थ भरला मतलबी, दुनियेत आता येवढा की,
संशयाच्या जगबुडीतच,जग अता बुडणार आहे

साळसुद त्या,लालसेने लोक ते येती समोरी
हाव त्या नजरेतली पण सांग का लपणार आहे?

भव्य त्यांच्या इभ्रती अन भव्य त्यांची ती हवेली,
सोबती ना शोभणारे, झोपडे तुटणार आहे

राख माझी व्हायची, मातीतला इथलाच मी ही
पण इथे माझी गझल केंव्हातरी रुजणार आहे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ऊठ तू आता तरी (तरही)

Submitted by रामकुमार on 22 April, 2011 - 16:52

साचले सडके ढिगारे ऊठ तू आता तरी
षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू आता तरी!

झोपल्याने संपतो का आत वणवा पेटता?
जाळती हृदया निखारे ऊठ तू आता तरी!

पश्चिमेचे भोगवादी गार वारे वाहते
पूर्व केंव्हाची पुकारे ऊठ तू आता तरी!

सूर्य ढाळी दिव्य राशी,लोपला अंधार बघ
भंगले स्वप्नील तारे ऊठ तू आता तरी!

बांधल्या मुर्दाड भिंती माणसांनी भोवती
थांबवाया क्षूद्र नारे ऊठ तू आता तरी!

रामकुमार

गुलमोहर: 

य़ा जगण्याचे

Submitted by आनंदयात्री on 14 April, 2011 - 10:24

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही

कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही!

छोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही

रोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही!

बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही

गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही

गुलमोहर: 

छळतात माणसे ही

Submitted by रामकुमार on 2 April, 2011 - 12:08

तरही गझल : कैलासजींनी दिलेल्या नवीन ओळीवर माझाही सहभाग
वेळ नसल्यामुळे उशीर झाला,क्षमस्व!
=================================================

निज पाप आठवूनी रडतात माणसे ही
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही

कळपामधील दुस-या सलतात माणसे ही
हिटलर जिवंत आहे म्हणतात माणसे ही

इमले मनोरथांचे रचतात माणसे ही
(होता भुकंप अवचित खचतात माणसे ही)

दिसती निवांत तरिही नसतात माणसे ही
अस्वस्थ अंतरंगी असतात माणसे ही

डोळ्यांत आसवांना धरतात माणसे ही
ओठी हसून पोटी कण्हतात माणसे ही

स्वप्नी, भ्रमात लटके रमतात माणसे ही
झाकून आत जखमा हसतात माणसे ही

कसली भिकार शेती कसतात माणसे ही?

गुलमोहर: 

तो माझा वाडा होता...

Submitted by अ. अ. जोशी on 22 March, 2011 - 11:25

तो माझा वाडा होता अन ती वाड्याची खिडकी
अजून जपली हृदयी, होती जरी इमारत गळकी

गुणी मुलांनी आपआपले वाटे करून नेले
उरले आई-बाबा, ...विटकी पिशवी, ...वस्त्रे मळकी

वस्त्रें चमचमती, लखलखते महाल, गाड्या भारी
जगणे राजस, खाणे ताजे; ...तरी मने का कुजकी?

पहा, जगाची रीत अशी, ना कुणी कुणाचा वाली
कुणी नाहते मद्याने तर कुणास नसते 'दिडकी'

असते अशी नोकरी, ललना, कीर्ती, सत्ता, प्रतिभा
पहा, पहा आलीच... म्हणेतो निघते घेउन गिरकी

जरी दूरच्या देशांमध्ये नाती जोडुन आलो
तरी आपल्या शेजारी का नजर राहते तिरकी ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गळते कपाशी..!

Submitted by अ. अ. जोशी on 20 March, 2011 - 11:04

विणले मगाशी..
नाते कुणाशी ?

माझी नसे, पण..
असते उशाशी..!

भरपेट कोणी...
कोणी उपाशी..!

नयनी न अश्रू;
गळते कपाशी..!

द्या सूख! ठेवा..
दु:खे मनाशी..!

नाते जगाशी;
नव्हते तुझ्याशी..!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल