झालो होतो सर्वांचा मी जळल्यावरती

Submitted by अ. अ. जोशी on 5 November, 2012 - 09:35

जे कधीच नव्हते माझे, आले कळल्यावरती
बघ, झालो होतो सर्वांचा मी जळल्यावरती

हे जीवन म्हणजे नुसती शोभा नाही काही
हे कळेल केंव्हा? सारी गात्रे गळल्यावरती ?

दु:ख कुणाला होते तर होतो आनंद कुणा
बघ, ताव मारला जातो वड्यांस तळल्यावरती

वंशज एकदिलाने वावरले समोर माझ्या
अन वाटे पडले पाय जरासे वळल्यावरती

कुणी एवढे दु:ख कशाला सहन करावे ? का?
समजेल तुलाही 'अजय' स्वतःला छळल्यावरती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे कधीच नव्हते माझे, आले कळल्यावरती
मी झालो होतो सर्वांचा मग जळल्यावरती असे सुलभ वाटले (माझ्यापुरते)

हे जीवन म्हणजे नुसती शोभा नाही काही
हे कळेल केंव्हा? सारी गात्रे गळल्यावरती ?

आवडले ...... !

वंशज एकदिलाने वावरले समोर माझ्या
अन वाटे पडले पाय जरासे वळल्यावरती....व्वा! क्या बात! क्या बात!