दु:ख म्हणजे सावली होती

Submitted by आनंदयात्री on 5 August, 2011 - 06:11

माणसे गावातली होती
वाटले, ती आपली होती

गवगवा नुसताच दानाचा
मूठ त्यांनी झाकली होती

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती

मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती

उंबरा ओलांडला तेव्हा
पावले रेंगाळली होती

मी खुळा समजून घेणारा!
(ती कुठे ओशाळली होती?)

मी जगावर प्रेम केले अन्
जवळच्यांशी जुंपली होती

वादळे नशिबातही होती
छप्परे भेगाळली होती

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती

सुख उन्हासम तळपले होते
दु:ख म्हणजे सावली होती

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

गवगवा नुसताच दानाचा
मूठ त्यांनी झाकली होती.....व्वा

उंबरा ओलांडला तेव्हा
पावले रेंगाळली होती.....सुरेख.

मी खुळा समजून घेणारा!
(ती कुठे ओशाळली होती?)..........जबरी.

सुख उन्हासम तळपले होते
दु:ख म्हणजे सावली होती..........हा ही छान शेर.

सुंदर गझल.

मस्तच.....

मी खुळा समजून घेणारा!
(ती कुठे ओशाळली होती?)

सुख उन्हासम तळपले होते
दु:ख म्हणजे सावली होती. >>. हे विशेष ! Happy

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती >> सुंदर शेर!

मी जगावर प्रेम केले अन्
जवळच्यांशी जुंपली होती>>> मस्त!

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती>>> व्वा! (हाही लक्षात राहणार, श्वासाचा उंच झोपाळा)

गझल आवडलीच! Happy

-'बेफिकीर'!

अत्यंत सुरेख गझल, नचिकेत.
फार आवडली.

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती

व्वा !

मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती

सुंदर !!

उंबरा ओलांडला तेव्हा
पावले रेंगाळली होती

क्या बात है !

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती

सुरेख !! Happy

आनंददायक गझल !

अरे बापरे! भरपूरच आणि भरभरून प्रतिसाद आले आहेत.. Happy
नवीन काहीतरी करून पाहायचं होतं म्हणून या वृत्तात एक प्रयत्न करुन पाहिला होता..

भुंगा, निशिकांतजी, शाम, कविता, मुक्ता, झाड, सुप्रिया, हर्षदा, आर्या, वीरू, विशाल, वर्षा, नाद्या - thanks! Happy

बागेश्री, Happy

बेफिकीर, ज्ञानेश, डॉक - धन्यवाद! Happy

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती

मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती

हे शेर आवडले Happy

मस्त गझल नचिकेत...

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती

मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती >>> आवडले हे शेर खूप

फक्त भरदुपारीही मध्ये जो 'ही' आहे तो खटकला... सुस्ती तर दुपारीच येते ना... दुपारीपण म्हनजे आणखी कधी येते?

फक्त भरदुपारीही मध्ये जो 'ही' आहे तो खटकला... सुस्ती तर दुपारीच येते ना... दुपारीपण म्हनजे आणखी कधी येते?
>>>
अरे!!! मिल्या, वेदनेच्या भरदुपारीही म्हटलंय! भर दुपारीही म्हणजे कमालीची वेदना असतानाही आसवे सुस्तावली होती असं म्हटलंय.. आय होप, आता कळलं असेल... नाहीतर बोलूच अजून... Happy

दुपारीपण म्हनजे आणखी कधी येते>>> Lol

अरे!!! मिल्या, वेदनेच्या भरदुपारीही म्हटलंय! भर दुपारीही म्हणजे कमालीची वेदना असतानाही आसवे सुस्तावली होती असं म्हटलंय..>>> Lol

Pages