पाककृती..

Submitted by Kiran.. on 11 February, 2012 - 00:25

अपरंपरागत पाककृतीसाठी या बाफचा उपयोग करावा.

साखरेचा पाक

एक/दोन तारी पाक

२ वाट्या साखर १ वाटी पाणी घ्यावे. पाणी पिऊन टाकावे. वरून साखर खावी. नंतर गॅसवर बसून पाक करायला ठेवावा. उकळी आली की गॅस मंद करावा. २ मिनिटे चांगले उकळल्यावर, दोन बोटाच्या चिमटीत एक तार धरून पहावी. ही तार पाच अ‍ॅम्पिअरच्या सॉकेटमधून आलेली असावी. एकच तार बोटात धरून बटण चालू करायला सांगावे. अशा पद्धतीने एकतारी पाक तयार होतो.

हा पाक रवाबेसन लाडू,मोतीचूर लाडू,राघवदास लाडू, जिलेबी (एकतारी) साठी छान असतो.

गॅसवर बसलेले असताना दोन तारा दोन हाताच्या बोटांच्या चिमटीत पकडाव्यात. यातली एक तार निगेटीव्ह आणि एक पॉझिटीव्ह असावी. इतर प्रोसेस सारखीच. या पद्धतीने दोन तारी पाक तयार होतो.
पाकातल्या पुर्‍यांसाठी हा अतिउत्तम. याला पक्का पाक सुद्धा म्हणतात याचा साखरभात करताना सुद्धा उपयोग होतो.

३.गोळीबंद (पक्का) पाक म्हणजे ३ वाट्या साखर आणि १ वाटी पाणी गिळणे. दुस-या एका वाटीत थंड पाणी घेऊन त्यात शुगरफ्री गोळी टाकणे . हे मिश्रण खाऊन गॅसवर बसणे. चांगली उकळी येऊ द्यावी. मग गॅस बंद करणे. हा पाक डायबेटीसला चालत असून याचा उपयोग पाकातले चिरोटे, शंकरपाळ्या करण्यासाठी होतो.

नेहमीपेक्षा वेगळ्या पाककृतींसाठीच हा बाफ आहे. चला तर मग आपापली भर टाकूयात.

गुलमोहर: 

२ वाट्या साखर १ वाटी पाणी घ्यावे. पाणी पिऊन टाकावे>> अरे ओये, मी ह्या वाक्यालाच कसली हसलेय.. Lol
नंतर हसतच गेलेय!! मस्त वीकेंड ट्रीट.. Rofl

ही तार पाच अ‍ॅम्पिअरच्या सॉकेटमधून आलेली असावी>> हा महान होता!! _/\_ Lol
यातली एक तार निगेटीव्ह आणि एक पॉझिटीव्ह असावी. इतर प्रोसेस सारखीच.>>+ve & -ve टू मच रे!!

दिनेशदा, ह्या किरण्या गॅसवर बसलेला एकतारी पाक करतानेचे प्रॅक्टीकल फोटोज टाकायचा Biggrin

हे मिश्रण खाऊन गॅसवर बसणे.
>>>>>>>>>>>>>>

हा पाक मुळव्याधीवर पण रामबाण ऊपाय आहे काय रे किरण्या Wink

Rofl
दिनेशदांना अनुमोदन! Biggrin
'पाक'कृती फार कॉम्प्लिकेटेड दिसतेय. फोटो टाकले, तर समजायला सोपी जाईल. Biggrin

ह्या पाककृतीचं आणी व्हॅलेंटाईन डे चं काही नातं आहे का? Uhoh

हे म्हणजे, संक्रांतीच्या वेळेला गुळाच्या पोळ्या, तिळगुळाचे, दिवाळीच्या वेळेला फराळाचे धागे निघतात, त्याचप्रमाणे व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर हा धागा काढलास म्हणुन विचारलो हो! Wink

किरण्या.. Rofl तूच गॅसवर बसलेलायेस आणी पाक कर्तोयेस असं दृश्यं आलं डोळ्यापुढे..
आता फोटू ट्टाकच लौकर!!!

Pages