रंभा घायाळकर - तिस-या रांगेतुन.....
माननीय मायबोलीकर मायबाप मंडळींना मानाचा मुजरा....
थांबा.... माझ्या ह्या आदरातिथ्यानं काहि बरं वाटुन घेऊ नका.... ह्यातला प्रत्येक शब्द-न-शब्द मी अतिशय रागानी लिहलेला आहे. खरं तर मी तुमच्यावर खटलाच भरायला हवाय...
माननीय मायबोलीकर मायबाप मंडळींना मानाचा मुजरा....
थांबा.... माझ्या ह्या आदरातिथ्यानं काहि बरं वाटुन घेऊ नका.... ह्यातला प्रत्येक शब्द-न-शब्द मी अतिशय रागानी लिहलेला आहे. खरं तर मी तुमच्यावर खटलाच भरायला हवाय...
आधीचा भाग इथे वाचा
http://www.maayboli.com/node/12831
हायवेवरून आत शिरणा-या रस्त्यामुळे झालेल्या चौकात कोप-यात गांधींजींचा पुतळा अनुयायांच्या प्रतीक्षेत काठी टेकत उभा होता. सर्वत्र दाट कळोख असूनही रातकिड्यांचा किर्रर्र आवाजही नव्हता. महात्म्याच्या प्रभावाने त्यांचेही मौनव्रत चालू असावे. पुतळ्याखालच्या अंधूक प्रकाशात मध्यरात्री काँग्रेसी बगळे जमले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपला उमेदवार पडल्याने तिथे आत्मपरीक्षण केले जाणार होते.
"बबन्या, किती वाजलं रं ?
चपटी संपवण्याच्या बेतात असणारा बबन्या घड्याळात बघत म्हणाला " दहा दहा "
आमचे एफबीआयचे खाते भलतेच नाणावलेले आहे. ऑर्कूटवरचे फेक प्रोफाईल पकडणा-या पथकाचा मी प्रमुख होतो. सध्या माझी बदली गुप्तवार्ता विभागात झालेली आहे. ग्लोबलायझेशन मुळे आमच्यावर कामाचा ताण वाढलाय. भारत नामक देशांत सीबीआय नावाची एक तपासयंत्रणा आहे. ही यंत्रणा पुरावे नष्ट करण्याचे काम करते. गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ही यंत्रणा जगामधे अव्वल मानली जाते. आमचे काम मात्र त्याला पकडणे हेच झालेय...!!
(डीसक्लेमर :-- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. काल्पनीक लिखाण.)
"ॐ आंतजालचंडीका प्रसन्न"
ॐ र्हींं क्लीं भगबुगे..भगनी भागोदरी..भगमासे..भौमी ..भू.. ॐ फट् स्वाहा !!
नमस्कार मायबोलीवासीयांनो, ॐ फट् स्वाहा !!
"कळल की नाही ? " डोम्या कावळ्याशेजारी स्थान ग्रहण करताच बोलला.
"काय रे ?" कावळ्याने मान उंचावत विचारलं.
"अवधुत गुप्तेंचा 'झेंडा'. आता 'फडकतो' की 'भडकतो' ते माहीत नाही ?" डोम्याने पुडी सोडली.
"का रे ?" कावळ्याने शंकीत स्वरात विचारलं.
"निखारे हातात घेतले की हात भाजतोच, नाही का ? पहिलाच चित्रपट आणि तोही सरळ ठाकरे खानदानावर. गुप्ते 'गुप्त' झाला नाही म्हणजे मिळवलं ?" डोम्याने आपला तिरकसपणा ऐकवला.
"डोम्या, आडनावांवर कसल्या कोट्या करतोयस ? कोठीकरांसारख्या " कावळ्याने चोरलेलं वाक्य फेकलं.
....................माझ्यासारखा साधा, सरळ, पांढरपेशी, व्हाईट कॉलर माणुस गुलाबी फेटा घालुन तमाशाला गेला, ह्याचं कारण आमच्या ध्यानमंदिरातल्या (ज्याला काही कोत्या मनाचे क्षुद्र जीव दारुचा गुत्ता म्हणतात..) रसिक समिक्षकांनी केलेलं चुकीचं समिक्षण.... !
दारु प्यायल्यावर माणुस खरंच खर बोलतो हे धादांत खोटं आहे....
कुतुहल हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुतुहलच्या वाटेला गेलं की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं.....
नव्हत्याचं... मुळीच नव्हतं होतं.
ह्या कुतुहलाच्या नादात माणसाला पार बरबाद होताना पाहिलय. आजपर्यंत ह्या कुतुहलापायी मी कित्येकदा मार खाता खाता राहिलोय..... (........आणि कित्येकदा खाल्लायही !!)
"डोम्या, तुला कळल असेलच, ओबामाना शांततेच नोबल मिळतय." कावळ्याने डोम्याच्या माहीतीज्ञानाची चाचपणी केली.
"हो, पण त्यातली मेख तुला माहीत आहे का ? निवडसमितीच्या लिस्टमध्ये ओबामांच नाव नव्हतचं मुळी." डोम्याने हळूच एक छोटा आपटीबार टाकला.
"काय सांगतोस काय ? " एका कर्कश कावकावसहीत कावळा जागच्या जागी उडाला. (पंख न हलवता)
"ओबामांना प्रेसिडंट होऊन अजून वर्ष झालं नाही, मग एवढ्यातच त्यांच्या शांततेचा साक्षात्कार जगाला कसा काय झाला ? " डोम्याने कावळ्यालाच उलट प्रश्न टाकला.
"मग असं कस झाल ?" कावळा नेहमीसारखाच बुचकळ्यात.
आणीबाणी आली , गेली , संजय गांधींना भरपूर चांगले , वाईट नाव मिळाले . जसे जगले , तसेच ते, भरपूर गाजावाजा होत मृत्यू पावले , नंतरही त्यांचे नाव बरेच दिवस गाजत राहिले, पण ते खरे अमर झाले ते ’संजय गांधी निराधार योजने’ मुळे. अनेक निराधारांना त्यांच्यामुळे आधार मिळाला, अनेकांचा पहिला असलेला आधार आणखी बळकट झाला, तर काहींच्या गंगाजळीत एक दोन थेंबांची आणखी भर पडली! पण प्रत्यक्षात, आणीबाणीतही आली नसेल, अशी आणीबाणीची वेळ आता माझ्यावर या योजनेमुळे आली होती, याची, ’आपण निराधारांचे आधार आहोत’ , या कल्पनेत (वरती) आनंदात असलेल्या संजय गांधींना थोडी तरी कल्पना असेल का?