विनोदी लेखन
सुटलेल्या पोटांची राजगड स्वारी!
सिझलर कि थंडलर.....
स्थळ : हैदराबाद सेंट्रल, जागा : नूडल बार, वेळ : रात्रीचे आठ - साडेआठ.
मुख्य कलाकार : राहुल आणी रुजुता.
सहकलाकार : वेटर १ ला, वेटर २ रा, व 'चीनी'कम, सोबत काही पाहुणे कलाकार.
राहुल :चल आज आपण सिझलर खायच का ?
रुजुता :हो चाSलेSल. ( आवाज जरासा बोबडा, तोंडात पाणी आलेलं )
राहुल :ते बघ तिथे नूडल बार, जायच ?
रुजुता :हं चला ( आवंढा गिळून )
दोघांची पावल नूडलबार कडे वळतात , दारावर एक 'चीनी' कम स्वागत करते. मिचमिचे जपानी 'सुज'मट डोळे, उंची चार ते पाच फुट जेमतेम, दात ओठां वर बाहेर येवून आराम करत असलेले.
चीनीकम :ह्यांलो सर ,हँव मेन्नी पिपल ?
पुलं, निळा कोल्हा आणि....
पिपात पडलेल्या निळ्या कोल्ह्याचे पितळ अखेर उघडे पडले आणि सगळ्या कोल्ह्यांनी त्याला राज्यपदावरून पदच्युत करून हाकलून दिले.
निळा कोल्हा रानोमाळ भटकत निघाला आणि अखेर तो एका आमराईत आला.
आमराईत जरा विश्रान्ती घ्यावी म्हणून तो एका डेरेदार झाडाच्या दिशेने निघाला.
झाडाजवळ गेला आणि बघतो तर काय.. !
तिथे मध्यम वयाचा, चश्मा घातलेला आणि मिश्किल हसणारा एक माणूस एका चिमुरड्या मुलीबरोबर गाणे म्हणत होता. 'अरे, हे तर पुलं देशपांडे !' निळा कोल्हा म्हणाला आणि झाडाजवळ जाऊन पाहू लागला.
चिमुरडी अगदी जीव ओतून गाणे गात होती.
'नाच रे मोरा आंब्याच्या वनात,
नाच रे मोरा नाच.'
समोर मोर नाचत होता..
प्रेमाचे विज्ञान.
मी फार टेक्नीकल बोलतो,
अस सारख वाटत होत तिला,
"मै ऐसा ही हूँ " म्हणुन ,
सांगू तरी कस तिला .
ती म्हणते बघ ना रे,
सुटलाय धुंद गार वारा,
मी म्हणतो हवामान खात्याने,
दिला होता कालच इशारा.
ती म्हणते हात तुझा ,
किती उबदार वाटतो मला,
मी म्हणतो बहुतेक असेल ,
किंचितसा ताप मला.
मी म्हणतो समुद्राच्या पाण्यात ,
कैल्शियम चा फेस आहे ,
ती म्हणते काही सांगू नकोस ,
तू मोठी सायकोलोजिकल केस आहेस .
ती रोमांस मधली नजाकत मला सांगते,
मी सुद्धा गुणसुत्रांची गुंतागुंत सांगतो,
ती कपाळावर स्वतःच्या मारून घेते ,
मी पुढच्या वाक्याची वाट पाहतो .
आता हळू हळू मला प्रेमाचे,
कुणी सांगेल का?
१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?
४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?
५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
विनोदी स्तंभ - लेखन स्मित रेषा
विनोदी स्तंभ लेखन
स्मित रेषा
चेहऱ्यावरील काही स्नायूंच्या ताणांची परिणिती म्हणजे भाव दर्शन. ओठांची चंद्रकोर स्मितरेषा तर ओठांचा चंबू चुंबनाचा! कपाळाला आठ्या म्हणजे त्रासिकपणा तर उंचावलेल्या भुवया ताणले्ल्या अपेक्षा!
हसऱ्या चेहऱ्र्याचे नेहमीच स्वागत होते. खेटर खाल्लेला चेहरा कोणाला आवडणार? कदाचित पडेल चेहऱ्याच्या रडेल प्राण्याला!
स्मितरेषा म्हणजे मोफतका माल. चेहऱ्याची किंमत मात्र वाढवतो. स्मित नकली व असली प्रकारात मिळते. तोंड देखले स्मित पाठ वळताच मावळते. मोहक स्मित आठवणीत राहते.
लव लेटर
नाक्यावरच्या पिंटूच एकदा,
सोसायटीतल्या पिंकिवर प्रेम जडल,
लव लेटर लिहून दे ,
मित्रांनी पिंटूला फूल उचकवल.
पिंटून लिहिल लव लेटर,
रात्र रात्र जागुन जागुन ,
चंद्र चांदण्या डार्लिंग जानू ,
भरल त्याचात कोम्बुन कोम्बुन.
गाडीवरती ट्रिपल सीट बसून,
रात्रि पिंटू सोसायटीत आला ,
घाबरू नको पिंटू म्हणुन ,
मित्रांनी त्याला धीर दिला .
दगडाला लपेटून लेटर ,
पिंकिंच्या खोलीकडे भिरकावल,
खिड़की फुटायचा आवाज आला ,
लेटर तसच हातात राहील.
कोण आहे रे तिकडे म्हणुन ,
पिंकिच्या आईने दार उघडले ,
पिंटूला तिथच सोडून देऊन ,
मित्र त्याचाच गाडीवरून पळाले.
चोर चोर चोर ओरडत ,
...गायवाले मास्तर...
मित्रानु, आमचा लहानपणातला बराचसा आयुष्य ह्या कोकणात गेला. तेच्यात सुद्धा विशेषतः माझा आणि माझ्या मोठ्या भावाचा बराचसा लहानपण कोकणात गेला. तेव्हाचा कोकण (म्हणजे १९७४-७५) आणी आजचा कोकण ह्येच्यात जमीन-अस्मानाचो फरक पडलोहा.
हे करून पहा.. मज्जाच मज्जा!!!
कधी कधी रस्त्यावर चालताना वा गाडी चालवताना विषय सुचतात, वाटतं आत्ता घरी गेल्यावर यावर पोस्ट लिहून टाकू. पण घरी येइपर्यंत ते काय होतं तेच आठवत नाही. तर कधी कधी काही विषय, काही घटना इतक्या छोट्या असतात की त्यावर (माझ्या कुवतीच्या लेखकाला) एक लेख शक्य होत नाही. म्हटलं की आज अशाच छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र करुन काही लिहिता येतय का ते पाहू. यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या वेंधळेपणाच्या आहेत, तेव्हा हासू नका बरं आम्हास्नी 