"काय तुमची बायको घरी स्वयंपाक करायला नकार देते? हॉटेलची बिलं दिवसेंदिवस वाढत चाललीयेत? तर आम्हाला भेटा अथवा लिहा.. होय होय हिप्नॉटीझमने बायकोला तुम्ही रोज स्वयंपाक करण्यास प्रवृत्त करू शकता.. एकच कानमंत्र आणि स्वैपकाचे बदलेल तंत्र ...आता तुम्ही आणि तुमची घरगुती पोळी भाजी आहात फक्त एक फोनकॉल दुर" जाहिरातीवर लक्ष गेलं आणि काल दगडुशेठला नारळाचं तोरण चढवताना केलेली प्रार्थना देवानी ऐकली असं मनातल्या मनात खुश होऊन.. बायको नावाच्या बोक्याचं (आमच्या घरातला बोका तीच हो.. मी आपला गरिब मनीमाऊ...
'झाल्ल्या गोष्टीक ईलाज नाय, जा काय नशिबात आसा तांच घडतालां, तेका दुसरो पर्याय नाय...',
'जन्माक येणारो प्रत्येक प्राणी शेवटी कधी नाय कधीतरी जातलोच, फक्त कोण आधी जाता, कोण नंतर जाता, जन्माक येणा आणी परत जाणा आपल्या हातात नाय...' ---
थांबा, थांबा, थांबा... अशे वैतागा नकात. माका म्हायत आसा; वरची सगळी वाक्यां 'जाणती' माणसां 'कधी आणि खयच्या' प्रसंगाक वापरतत तां. पण माका एक सांगा, कोणाचां 'मराण' ह्यो किश्श्याचो विषय होवक शकता काय? पटना नाय मां?... तीच गजाल तुमका आज सांगतंय...
(माझ्या मुलाचा आवडता कार्यक्रम म्हणजे नवकवीचा प्रवेश. 'पप्पा, तुम्हीपण असं लिहून पाठवा, म्हणजे ते लोक आपल्याला बोलवतील. मग मला सुनीलकाकांना भेटता येईल.' माझ्यासारख्याला त्याने अशी चावी द्यायला नको होती. पुढे जे आहे ते असल्या चावीचं फलित आहे. बघा, झेपतय का ते ? )
(एक विचारात पडलेला कवी. हातात वही व पेन. पेनाने डोके खाजवत शुन्यात नजर लावून येरझारा मारतोय.)
नवकवी : (प्रवेशून) हे काय, आज माझ्याआधी बकरा हजर
कोंबड्याच्या कानात घड्याळाचा गजर
कवी : (नवकवीला पहाताच) सापडली...सापडली...
"आयच्या गावात." कावळ्याने चोच खोलली.
"म्हणजे नेमकं कुठे ? " डोम्याने मान उंचावत, झोकात चालणार्या कोळणीच्या झाकल्या टोपलीला हेरत विचारलं.
"ते सुनिल तावडेंना विचारायला हवं. जांपन्नाचा गेटप चढवला की ते असलं काहीही बडबडतात. कॉमेडी एक्स्प्रेस बघतोस ना ? " कावळा पुढे सरसावला.
"तेच ना.. ज्यात दोघे जण एकमेकाच्या समोर दोन हाताचं अंतर सांभाळत उभे असतात.. तेच संवाद, तेच हातवारे आणि त्याच हालचाली पुन्हा पुन्हा करतात.... " कावळ्याने मान डोलावली.
घाणघापुरचा SMS
आयुष्यात वादळं ही येणारंच.... आणि आलेली वादळं तुमचं आयुष्य बदलुन टाकणारंच...
पण मोठी मोठी वादळं येताना काय भारी भारी कारणं असतात हो लोकांकडे ! अघोरी अन्याय, जीवघेणी फसवणुक, पराकोटीचे अपयश, सूड, महत्वाकांक्षा अशा मराठी कादंबरीत वाचलेल्या पण सामान्य माणसाला कधीच अनुभवायला न मिळालेल्या गोष्टींनी खुप वादळं येतात म्हणे....
काही काही लोक तर ह्या ही पेक्षा नशीबवान असतात. लग्नाआधि प्रेमभंग, लग्नानंतर अपेक्षाभंग, मग अनपेक्षित चढलेले प्रेमरंग... मग बायकोला कळाल्यानी झालेला रसभंग.... अशी एकदम रोमॅंटीक वादळं पण असतात हं !
"अरे डोम्या, होतास कुठे काल ? " कावळ्यांने पावाच्या तुकड्यावर आपली पकड घट्ट करत विचारलं.
"अदबीनं... अदबीनं नाव घ्यायचं. नाहीतर जातिवाचक शिवी घातली म्हणून अॅट्रासिटी अॅक्टखाली आत टाकेन." डोम्याने झाडाच्या फांदीवर चोच घासली.
"जातिवाचक ? "
"डोमकावळा ही आमची जात आहे. उल्लेख अदबीनं करायचा."
"मित्रा, 'डोम'कावळ्या, काल कुठे होतास ?"
"आत्ता कस्स ! टिळक भवनात गेलो होतो."
"डोम्या लेका, उगाच टेपा लावू नकोस. त्या सगळ्या जागा आपल्या धर्मात बहिष्कृत आहेत हे विसरलास काय ? "
.......अशीही उत्तरे- भाग १ .......
.... थोडक्यात उत्तरे लिहा ....
प्रश्न - भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहेत. ?
उत्तर - लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न - पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर - हप्तावसूली.
प्रश्न - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर - ओला होईल.
प्रश्न - अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर - अभिषेक.
प्रश्न - एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर - चार.
प्रश्न - अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?
उत्तर - जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
गेल्या तीन दिवसात माझ्या हातुन अक्षम्य अपराध झालेत आणि माझे सगळे गुन्हे मला मान्य आहेत.
पण प्लीज एकदा माझं ऐका आणि मला सांगा की....
'च्यामायला... माझं चुकतय कुठे... ?'
परवा धोब्याला इस्त्रीसाठी होते-नव्हते ते कपडे दिले आणि काल टॉवेलवर त्या मुर्ख धोब्याची (का मुर्ख मी कोणास ठाउक... !) वाट बघत बसलो. आता ऑफीसला उशीर होणार आणि विनाकारण बॉसच्या शिव्या खाव्या लागणार ह्या विचारानी संतापलो आणि त्या धोब्याच्या घरी जाऊन त्याला धुवावं असं विचार करायला लागलो.
आपल्याला मराठी विनोद आवडतात का ?
आपले उत्तर होय असल्यास भेट द्या "सर्वोत्तम मराठी विनोदला". आपल्याला येथील विनोद नक्किच आवडतील.
दिनु.