विनोदी लेखन

फसवा हसवी - ३ (शेवट)

Submitted by देवनिनाद on 6 March, 2010 - 04:36

..... इसमाला डोक्याला हात लावून बसलेलं पाहून ...

विसरभोळे - अ‍ॅक्शन .. बोल, बोल डॉयलॉग बोल. घाबरू नकोस तू उद्याचा स्टार आहेस ... कमॉन, कमॉन .. जरा जोर लाव सगळं आठवेल तुला. .... तुला रास आहे तुझी तुला काहीही होणार नाही .... दर गुरुवारी सोनी टीवी वर १० वाजता .... होम मिनिस्टर पाहात जा.

इसम - आज गुरूवारच आहे जाऊ मी.

गुलमोहर: 

राँग नंबर

Submitted by मंदार-जोशी on 6 March, 2010 - 01:18

वेळः कै च्या कै. राँग नंबरला वेळ असते का? साधारण आपला आराम करायची वेळ असते तेव्हाच लोकांना हवे असलेले बरोबर नंबर राँग लागतात. उदा. रविवार पहाटे आठ. हो, बरोबर वाचलंत तुम्ही. पहाटे आठ. रविवारी ह्या वेळेला पहाटच असते की.

फोन: आमचा लँडलाईन

landline.gifराँग नंबर (१) - करंबेळकर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
एक स्त्री: "हॅलो, करंबेळकर का?"
मी: "नाही, राँग नंबर"
स्त्री: "ओह, सॉरी हां"

काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर आहेत का?"
मी: "नाही, राँग नंबर"

गुलमोहर: 

भाषेच्या गमती-जमती

Submitted by अभय आर्वीकर on 4 March, 2010 - 21:25

भाषेच्या गमती-जमती
दोन महिण्यापुर्वीपर्यंत मी व्याकरणामध्ये फारच ढ्यॅ होतो हे तुम्ही जाणताच. माझ्या कवितांमधील व्याकरणाच्या चुका शोधून "त्यांनी" मला कसं धुतलं,पिळलं आणि वाळायला घातलं याचे तुम्ही जीते-जागते, चालते-बोलते साक्षीदार आहात. मात्र माझ्या व्याकरण अज्ञानामागे "हा विषय रटाळ" आहे एवढेच कारण नाही तर या विषयीची पराकोटीची चिड हे एक प्रमुख कारण आहे.
त्याचं काय झालं...

गुलमोहर: 

तात्पर्य काय?? भाग - १

Submitted by ऋयाम on 4 March, 2010 - 08:10

"थंडी कमी होऊ लागलीये नाही ह्या आठवड्यापासुन?"
कालच मनात म्हटलं.. "आता काही याची गरज नाही." आणि हीटर बंद केला.
रात्रीचे १२:३०होऊन गेले होते.
तीन महिने झाले. रोज हीटर चालु ठेवुन झोपतोय. "हीटर" कसला? "सुर्यच" तो. हा पहा: -

हा "रात्रीचा सुर्य" (दिवे बंद करुन)
sury1_1.JPG

हा "दिवसाचा सुर्य" (दिवे लावुन)
sury2_1.JPG

तर "सुर्य" बंद केला आणि गादीवर पडलो.

गुलमोहर: 

फसवा हसवी - २

Submitted by देवनिनाद on 3 March, 2010 - 00:58

विसरभोळे आणि इसम ....

.... इसम हमसा हमशी रडतोय हे विसरभोळे शांतपणे पाहतोय. त्याच ते बघणं हि विचित्र वाटल्याने इसम आणखी मोठमोठ्याने रडतो. आजूबाजूचे काही लोक गोळा झाले.

विसरभोळे - झमूरे .... रड अजून रड ... अजून थोडी लोक जमू दे .... चला, हाताची घडी तोंडावर बोट .. आता सगळ्यांनी मिसळपाव खायचा आहे. तेव्हा सगळ्यांनी तिकिटाचे पैसे काढा ... गाडी दहा मिनिटात सुटेल .... (हे ऐकताच जमा झालेले थोडं फार लोक `येडचं हाय' असं म्हणत निघतात, हिच संधी पाहून इसम रडणं थांबवत तिथुन निघणार तोच...

गुलमोहर: 

फोटो

Submitted by कौतुक शिरोडकर on 2 March, 2010 - 13:03

मंत्रीमहोदयांनी हॉलमध्ये बसलेल्या पी.ए. कडे पहाताच दात काढले," बोला, पी.ए. काय म्हणतेय जनता ?"
पी.ए. ने देखील बत्तिशी दाखवली," हाणा म्हणतेय."
मंत्रीमहोदय दचकले," काय ?"
पी.ए. ने घसरलेली जीभ सावरली, "आणा म्हणतेय. साहेब हरवलेत त्यांना शोधून आणा म्हणतेय."
मंत्रीमहोदयांनी सोफ्यात बसकण मारली," कोण म्हणतो आम्ही हरवलोय ?"
पी.ए. समोर वाकला," कामात हो. पाच वर्षे वॊर्डात फ़िरले नाही म्हणजे हरवले असं नाही म्हणत कोणी."
मंत्रीमहोदयांनी मान हलवून समोरची तपकिरीची डबी उचलली,"अरे मग, आम्ही काय रिकामे आहोत काय ?"

गुलमोहर: 

फसवा हसवी - १

Submitted by देवनिनाद on 27 February, 2010 - 06:12

स्थळ : बसस्टॉप. विसरभोळे स्टॉपवर उभे आहेत, इतक्यात त्यांचं लक्ष तिथल्याच एका इसमाकडे जातं.

विसरभोळे - अहो शुक शुक ... हो हो तुम्हीच ... प्लीज मला जरा डायल करा ना. मी माझा नंबर विसरलोय.

इसम - अहो नंबर विसरलात तर डायल कसा करणार ... तुम्हीच सांगा

विसरभोळे - कमाल आहे. सांगा काय सांगा. तुम्हाला साधे जानेवारी, फ्रेबूवारी इंग्रजी महीने माहीती नाहीत.

इसम - आता जानेवारी, फ्रेबूवारी हे महीने मध्येच कुठून आणलेत ... आपण तुमच्या नंबरबद्दल बोलतोय.

विसरभोळे - हे बघा साळेकर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे हे रोज रोज नंबर लावायचं सोडून द्या. मटका खेळणं अतिशय वाईट.

गुलमोहर: 

पी.एम.टी. उर्फ पुण्याची ऐश्वर्या राय

Submitted by मंदार-जोशी on 25 February, 2010 - 04:45

ह्या लेखात उल्लेख केलेल्या घटना मी पुणेकर नव्हतो आणि अधून-मधूनच पुण्यात येणे व्हायचे तेव्हाच्या आहेत.

PMT.jpg

गुलमोहर: 

यत्ता ८वी अ - १

Submitted by लंपन on 22 February, 2010 - 00:05

शाळेत यत्ता ८वी ते १० वी च्या मुलांना टेक्निकल/ संगणक/ शेती यापैकी एक ऐछीक विषय शिकवला जाई. संपूर्ण संस्क्रुत आणि टेक्निकल घेतले की 'अ' तुकडीत प्रवेश मिळत असे. माझ्या सर्वच मित्रांना टेक्निकलची प्रचंड क्रेझ आणि आवड.. मला 'अ' तुकडी, टेक्निकल याचे अजिबात सोयरसूतक नव्हते पण संपूर्ण संस्क्रुत आणि जिवाभावाचे मित्र यांच्यासाठी टेक्निकल आणि पर्यायाने 'अ' तुकडी मिळवणे अनिवार्य होते. टेक्निकल 'मिळवण्यासाठी ' ८वी च्या वर्षाच्या सुरुवातीला गणिताची ५० मार्कांची एक परीक्षा द्यावी लागत असे. गणित विषय मला फार्र फार्र आवडत असे, इतका की मी गणिते पाठ करत असे!! परीक्षा झाली आणि 'निकाल' लागला.

गुलमोहर: 

माझे वेट-लॉसचे प्रयोग : व्यायाम

Submitted by वर्षा_म on 19 February, 2010 - 02:16

कंटाळा आला तेच तेच सल्ले एकायचा. उठसुट कुणीही आता सल्ला द्यायला लागलेय. अहो सल्लेपण काय एकेकाचे विचारु नका. परवा एक मैत्रीण म्हणे "अग काही न्युज आहे का? काही खावेसे वाटले तर सांग. अशावेळी स्वत: करायचा कंटाळा येतो" Uhoh आता मला काय धाड भरलीय म्हणुन. पण तशी काही न्युज नाही म्हटल्यावर तिने लगेच काळजीचा सुर लावला. "जरा व्यायाम सुरु करच" असे म्हणुन Angry

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन