... अशीही उत्तरे-भाग-३
.... थोडक्यात उत्तरे लिहा ....
प्रश्न - आपले नांव सांगा ?
उत्तर - चक्कु सुर्या खुपसणकर.
प्रश्न - पत्ता द्या ?
उत्तर - कोणता देवु. टोपाझ की इरास्मिक ?.
प्रश्न - अहो गावाचे नाव सांगा ?
उत्तर - भामटीपुरा.
प्रश्न - आवडता चित्रपट?
उत्तर- पॉकेटमार,हाथ की सफाई.
प्रश्न - आवडीचे स्थळ ?
उत्तर - बस स्टॅंड,रेल्वे स्टेशन,गर्दीचे ठिकान.
प्रश्न - मासिक मिळकत?
उत्तर - ते लोकांच्या खिशावर अवलंबुन असते.
...........................................................
प्रश्न- देव प्रसन्न होऊन वर मागा म्हटले तर काय मागाल ?
उत्तर- आमच्या ३ मागण्या आहेत.
‘विठ्या, आरं माजी काठी खंयसर आसा?’... सकाळीसकाळी ‘मॊर्निंग वॊकाक’ निघालेल्या सदुनानानं मुलाला हाळी देत विचारलं आणि विठ्यानं हांतरुणातनंच ‘ऊं’ करत कूस बदलली.
विठ्या म्हन्जे, सदुनानाचं रत्नं... गाव त्याला ‘नानाची अवलाद‘ म्हणायला लागला, तेव्हापास्नं सदुनानाही त्याला ‘विठ्या’ म्हणायला लागला होता. मुलाला येताजाता हाक मारताना तरी तोंडात देवाचं नाव यावं, म्हणून सदुनानानं त्याचं नाव ‘विठ्ठल’ ठेवलं होतं...
तो लहान होता, तेव्हा त्याच्या मागनं पळताना सदुनानाची तारांबळ उडायची...
माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन.....
मी एक नशीबवान माणुस आहे. आयुष्यानी मला सगळं सगळं दिलं. प्रेम करणारी बायको... ऐकुन घेणारी मुलगी.... समजुन घेणारा बॉस..... कौतुक करणारे मित्र... सांभाळुन घेणारे सहकारी..... आदर देणारे शेजारी आणि.....
....आणि अजुन काय हवं आयुष्यात? मी तर ढगातुनच चालायचो. जमिनीवर तरंगायचो.... पण मी हे विसरलो होतो की आपल्याला ढगात अढळपद मिळायला आपण काय ध्रुवबाळ नाही. अर्थात तो ध्रुवबाळ जरी पुण्यात खरेदीला आला असता तरी.... असो.
डोक्याला झीट आला इतिहासात जावून. हे वाच ते वाच. टिपण काढ, सनाव़ळ्या शोध. आणि इतकं करून काय तर एकमत नाहीच. काल बाजारात सोनं मोडायला गेलो तर सराफ म्हणतो हे सोनं नाही. च्यायला, रोकडा मोजून घेतलं आणि हा म्हणतो सोनं नाही ? तासभर वादावादी झाली. शेवटी स्वभाव आडवा आला. निमूट त्याचे म्हणणे मान्य करून घट पदरात घेतली. आमच्या म्हणण्याला विच्चारतंय कोण..
... अशीही उत्तरे-भाग-२
.... थोडक्यात उत्तरे लिहा ....
प्रश्न - आपले नांव सांगा ?
उत्तर - श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न - पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर - सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न - महासागराची नावे लिहा ?
उत्तर - नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न - काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर - मेव्हणी
प्रश्न - कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर - अमिताभ बच्चन.
प्रश्न - उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
मित्र मैत्रीणींनो
माझे २०१० साठीचे १४ संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.
संकल्प १. - सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
"नवीन गाडी आहे, नीट नेता येईल ना घरापर्यंत?" धडधडत्या काळजाने मीराने अनयला विचारलं.
"मला कालच लायसन्स मिळालं आहे". हातातला परवाना अनयने जाहिरातीसारखं झळकवला आणि एकदम त्याच्या डोळ्यासमोर कालची परीक्षा नाचली.
"स्टॉप! स्टॉप!!" गलेलट्ठ परिक्षक ओरडला. घाबरुन त्याने खचकन ब्रेक दाबला.
"आय आस्क्ड यू टू टेक अ लेफ्ट टर्न"
"या, आय वॉज गोईंग टू..." वळून आत आल्यावरही हा माणून का भडकलाय तेच अनयला कळेना.
"... सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्णानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली नाही.

श्लेष अलंकाराच्या अशा उदाहरणा सारखी माहिती देऊन व्याकरण शिकवले तर मराठी व्याकरण मुले आयुष्यभर विसरणार नाहीत असे माझे मौलिक मत आहे. मनसे च्या भावी शिक्षण मंत्र्याना सांगायला हवे.!!
[ वैधानिक(?) इशारा : - सदर लेखनातील मजकुर थोडासा "ओव्हर" आहे असे माझ्या ब्लॉगवर एकान्नी म्हटल्यामुळे हा "इशारा" लिहीतो आहे. तरी वाचकान्नी खबरदारी घ्यावी. मी आपली थोडी मज्जा म्हणुन लिहीले आहे.. ]
परवा ट्रेन (सब वे) मधुन चाललो होतो, तेव्हा अचानक ट्रेन मधे लावलेल्या एका जाहिरातीकडे लक्ष गेलं...
"हिकारी-गावका केश कर्तनालय"
खरं तर रोज एक तास त्या ट्रेन मधून प्रवास करताना बरेचदा तिकडे लक्ष जायचं...
"किमोनो" घातलेल्या, हसर्या, सुंदर जपानी तरुणीचा, "यो-कोसो" अर्थात "या-रावजी" टैप फोटो होता त्यावर..