बाबा आंतरजालवाले

Submitted by निल्या on 20 December, 2009 - 13:03

(डीसक्लेमर :-- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. काल्पनीक लिखाण.)

"ॐ आंतजालचंडीका प्रसन्न"

ॐ र्हींं क्लीं भगबुगे..भगनी भागोदरी..भगमासे..भौमी ..भू.. ॐ फट् स्वाहा !!

नमस्कार मायबोलीवासीयांनो, ॐ फट् स्वाहा !!
ब-याच दिवसापासुन आंतरजालावर आंतरजालवासीयांना खुप अडचनी येत आहेत. या अडचनी वर मात करन्यासाठी बाबा आंतरजालवाले हे १० वर्षे आंतरजालावरील गुगल नावाच्याग गुहेत घोर तपश्चर्या करत होते १० वर्षाच्या घोर तपश्चर्ये नंतर बाबांना आंतजालचंडीका प्रसन्न झाली व तीने बाबांना काही रीध्दी सिध्दी दिल्या आहेत त्यानुसार बाबा आपल्या आंतरजालावरील भक्ताच्या समस्याचे निवारण करतात. बाबा सध्या एका मायबोलीवरील बाबांचा भक्त सदस्याच्या आयडी च्या रुपात आहेत. आपण बाबांच्या या चमत्कारांचा लाभ घ्यावा थोडेच दिवस बाबा मायबोलीवर आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी ॐ फट् स्वाहा !!

आंतरजालवाले बाबांकडे निवारण केल्या जाणा-या समस्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) मायबोलीवरील आयडी साठी गंडा दोरा मंत्रीत करुन मिळेल - त्याबदल्यात बाबांना १-२ लेख किंवा कविता दक्षीणा म्हनुन द्याव्या लागतील.
ॐ फट् स्वाहा !!
२) मायबोली प्रोफ़ाइल वरील फ़ोटोस कुनाची नजर लागु नये म्हनुन काळा दोरा मंत्रीत करुन देण्यात येइल - यासाठी दक्षीणा - मायबोलीवरचा एक जिवंत आय डी चा बळी द्यावा लागेल.
ॐ फट् स्वाहा !!
३) मायबोलीवर प्रसीध्दी मिळवण्यासाठी कानमंत्र दिले जातील - दक्षीणा २ डि. व्ही. डी. (तबकडी) चे बळी द्यावे लागतील.
ॐ फट् स्वाहा !!
४) तुमच्या मायबोली आयडी ला एखाद्या फ़ेक आयडी ने पछाडले असल्यास त्याचे ही बाबा आपल्या रीध्दी सिध्दी ने निवारण करुन देतील. असे कैक आयडी बाबा नी आंतरजालावरुन भ्रष्ट केले आहेत. आंतरजालावरील वाइट आसुरी शक्तींचा यामागे हात असतो असे बाबांचे मत आहे.
ॐ फट् स्वाहा !!
५) तुमचा संगणक/लॅपटॉप नीट काम करत नसेल त्यासाठी ही बाबा धागा मंत्रीत करुन देतील. तो धागा संगणकांच्या सी पी यु ला बांधला तर त्याला कधीही काही अडचन येनार नाही. आंतरजालावरील वाइट शक्ती तुमच्या आयडी मधुन तुमच्या संगणकात घुसतात व त्याच्या कामात बाधा निर्माण करतात. हा मंत्रीत केलेला धागा या वाइट शक्तीपासुन तुमच्या संगणकाचे रक्षण करतो या धाग्याला ऍन्टी मंत्रीत धागा असे म्हणतात.
ॐ फट् स्वाहा !!
६) तुमच्या ऑफ़ीसात मायबोली संकेतस्थळ ब्लॉक केले असेल त्यासाठी पण बाबा उपाय करुन देतील.
ॐ फट् स्वाहा !!
७) तुमचा बॉस तुम्हाला मायबोलीवर येउ देत नसेल त्रास देत असेल त्यासाठी बाबा एक ताइत मंतर मारुन देतील तो तुमच्या बॉस च्या डोक्याच्या केसाला बांधला तर तो कधीच तुमच्याकडे फ़िरकनार सुध्दा नाही याची गॅरंटी बाबा देतात (या त्रासापासुन बाबांनी आंतरजालावरील ओर्कुट् नगरीतील लाखो भक्ताचे कल्याण केले आहे कृपया माबोलीनगरीवासीयांनी लाभ घ्यावा)
ॐ फट् स्वाहा !!

यावीतीरीक्त बाबांकडे मायबोली वर येना-या कोनत्याही समस्याचे बाबांकडे निवारण करुन मिळेल. काळजी नसावी!
मायबोली,मिपा,उपा,ओरकुट वर सध्या बाबां चमत्कार करत आहेत. बाबांच्या चमक्तारांचा आंतरजालावर बोलबाला चालु आहे. आंतरजालावरील करोडो भक्त बाबांच्या चमत्कारांचा लाभ घेत आहेत. मायबोलीवासीयांनी पण घ्यावा.

ॐ र्हींस क्लीं भगबुगे..भगनी भागोदरी..भगमासे..भौमी ..भू.. ॐ फट् स्वाहा!
(३ वेळा म्हणा)

आता तीन वेळा म्हटले आहे बाबा प्रसन्न झाले खुश झाले आहेत त्यामुळे एक फ़ुकटचा कानमंत्र बाबा देत आहेत.

कानमंत्र - मायबोलीवासीयांनो येत्या अमावस्येच्या दिवशी शक्यतो काहीही लिखाण करु नका वाइट शक्तींचा प्रभाव जास्त असतो

ॐ फट् स्वाहा!


अगर आप मायक्रोसॉफ़्ट पे विश्वास रखते है तो आपको बाबा आंतजरजालवाले पे भी विश्वास करना होगा!

जय हो बाबा आंतरजालवाले कि! जय हो बा की

संपर्कासाठी बाबांचा पत्ता

मायबोलीनगर,
नोडगल्ली १२७९४
युजर बाबा

गुलमोहर: 

""यासाठी दक्षीणा - मायबोलीवरचा एक जिवंत आय डी चा बळी द्यावा लागेल."" आँ ? मग 'उषाताइन्चे सल्ले' कोण देणार ? बाबा आन्तरजालवाले ? Proud

Lol
ओ आंतरजालवाले बंगाली बाबा अजुन तुमच्या पोतडीत काय काय आहे ?
भांडणार्‍या आयडी वशीकरण , थोतांड आयडी निर्दालन , डु आयडी ना लिंबु मिरच्या , तुमच्याकडे मिळतं का ? Proud

Proud
ऍन्टी मंत्रीत धागा >>> हे हे हे Happy

भांडणार्‍या आयडी वशीकरण , थोतांड आयडी निर्दालन , डु आयडी ना लिंबु मिरच्या , तुमच्याकडे मिळतं का ? >>>> ह्या बरोबरच घालुन पाडुन बोलणार्‍या, टर ऊडविणार्‍या, फटकळ, कडु आयडीं च्या त्रासा वर बाबांकडे ऊपाय आहे का? Happy Wink

बाबांचा जय असो!
बाबा तुम्ही चुप का? Uhoh
<<<<<<भांडणार्‍या आयडी वशीकरण , थोतांड आयडी निर्दालन , डु आयडी ना लिंबु मिरच्या , ह्या बरोबरच घालुन पाडुन बोलणार्‍या, टर ऊडविणार्‍या, फटकळ, कडु आयडीं च्या त्रासा वर बाबांकडे ऊपाय आहे का?>>>>>>>>>
बोला बाबा बोला? Wink

बाबांकडे ऊपाय आहे का?>>>>>>>>>
बोला बाबा बोला? <<<<<

अहो.. बाबांना दोन पायाची कोंबडी आणी बाटली (पाण्याची)लागते. तरच बोलतात Wink

अहो.. बाबांना दोन पायाची कोंबडी आणी बाटली (पाण्याची)लागते. तरच बोलतात>>>>>>>
पान कोंबडी चालेल का? जरा विचारा!

बाटली (पाण्याची)लागते.>>>>>>>> बर झालं बाटली पाण्याची लागते असे सांगितले म्हणुन , नाही तरी मी काचेची देणार होतो, आणि आता किंबडी बद्दल म्हणाल तर खुराड्यात कोंबड्याच नाहीत सगळे कोंबडे आहेत (कोंबडी भ्रुण हत्येचा प्रभाव :अओ:)

नमस्कार बाबा ! तुम्हाला साष्टांग दंडवत!
मायबोलीवर उगाचच आद्ळ्-आपट करणार्या आय डी चा बंदोबस्त करा. तिकाटण्यात उलट्या पकाची कोंबडी उतरून ठेवीन