माझे शिकण्याचे प्रयोग : नेट सर्फींग
मध्यंतरी मला मैत्रीणींच्या ग्रुप मधे खुपच निवडुन टाकल्यासारखे वाटायला लागले. काय बोलतात एकमेकींशी तेच कळायचे नाही. बरे म्हणावे मला कळाले नाही तर आपले अज्ञान दाखवावे लागणार. 
खालील वाक्य एकली की खरच मैत्रीनी बदलल्या आहेत असे वाटायचे. कधी कधी तर यांनी पुर्ण लाज सोडली आहे असे वाटे. बघा तुम्हाला पण माझे म्हणने पटेल. कंसात माझ्या मनात आलेले विचार लिहीले आहेत.
मैत्रीण : "मला मेल कर."
(आता ही काय जादुगार आहे का फिमेल ची मेल करायला)
मैत्रीण : "तुझ्या ऑफिसात नाही ना ग हॉटमेल नी जीमेल वर बंदी?"
(:अओ:)
मैत्रीण : "बॉस आला की मी नेटची विन्डो बंद करते. उगी स्मायली पाहुन भडकायचा"